Dharmaday Hospitals : धर्मादाय रुग्णालयांना सरकार लावणार चाप , राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष नजर ठेवणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>धर्मादाय रुग्णालयांना आता सरकार चाप लावणार आहे. कारण या रुग्णालयांवर आता राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष नजर ठेवणार आहे. यासाठी विशेष कक्षाची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आणि या कक्षाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे सध्या १० टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी तर अतिरिक्त १० टक्के खाटा दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्याचा नियम करण्य़ात आला आहे. या खाटा निर्धन आणि दुर्बल घटकांना मिळवून देण्याचा अधिकार विशेष कक्षाला असणार आहेत. धर्मादाय रुग्णालयाकडून नियम धाब्यावर बसवल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे.</p>

[ad_2]

Related posts