Maratha Reservation Protest Chandrashekhar Bawankule Slam Uddhav Thackeray Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वर्धा:  मराठा आरक्षणप्रश्नी (Maratha Resrvation) विशेष अधिवेशन घ्यायचं कोणती भूमिका घ्यायची हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) ठरवतील. एकनाथ शिंदे जे ठरवतील. एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. त्यामुळे ते जे भूमिका घेतील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्याला भाजपा सहमत आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.   बावनकुळे वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे कारण महाराष्ट्र जो जळतो आहे, असे देखील ते म्हणाले. 

 बावनकुळे म्हणाले महाराष्ट्राचा सर्व समाज, सर्व वर्ग हा मराठा समाजाला आरक्षणच्या पाठीशी आहे. कोणी विरोधात नाही. एक जरी विरोधात असेल आणि मग रस्ता रोखला, घर जळालं तर ठीक आहे.मराठा आरक्षणाच्या बाजूने सर्व आहेत पण आपल्याला आरक्षण मिळताना इतर कुणाला त्रास होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाज हा पाठीशी आहे लक्षात घेतले पाहिजे. पूर्ण ओबीसी समाज हा मराठाला आरक्षण मिळावं याकरता पाठीशी आहे. यामुळे कुणाचे घर फोडून घर पेटवून कुणाला त्रास देऊन मला वाटतं. 

उद्धव ठाकरे दोषी

जरांगे पाटलांचा मत काय आहे हे मला माहीत नाहीय पण महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेला हे माहीत आहे की मराठा आरक्षणाची सुरवात आणि त्यांना आरक्षण देण्याचं काम फडणवीस यांनी केले आहे. मी त्या मंत्रिमंडळात होतो, मंत्रिमंडळात उपसमिती तयार करण्यात आली. विधानमंडळात कायदा पास केला, उच्च व सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवलं. मराठा समाजावर जो अन्याय झाला त्याचा दोषी उद्धव ठाकरे आहे, असे बावनकुळे म्हणाले.  

उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे

बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे मंत्रालयात अडीच वर्ष आले असते. ते फक्त दोनदा मंत्रालयात आले, दोनदा विधिमंडळात आले ते जर आले असते योग्य वकील लावला असता. मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे हे जर सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिल असत तर हे दिवस नसते आले असते जे आज आले आहेत. महाराष्ट्राची उद्धव ठाकरे यांनी माफी मागितली पाहिजे कारण महाराष्ट्र जो जळतो आहे. उद्धव ठाकरे  एकमेव व्यक्ती दोषी आहे.

देवेंद्र फडणवीस मराठा समाजाच्या पाठीशी

फडणवीस यांनी पूर्ण मराठ्यांना आरक्षण दिले होते तरीही त्याच्यावर कोणीही टीका करत असेल. महाराष्ट्राला सर्व घरोघरी माहिती आहे की, देवेंद्र फडणवीस हा एकमेव नेता असेल ज्यांनी मराठ्यांना आरक्षण दिले. ओबीसीचे आरक्षण कमी न करता दिले होते. यामुळे या भूमिकेतूनच पुढ गेलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही सर्व लोक मराठा आरक्षणच्या पाठीशी आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला आन्ही उभे आहोत पण या महाराष्ट्रात जी जाळपोळ सुरु आहे इतर समाजाला त्रास होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, बावनकुळे म्हणाले 

बावनकुळे म्हणाले,  सर्वपक्षीय बैठकीत सर्वांना बोलावले जाते, मागील बैठकीत मी होतो.  आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आहे. सर्व लोक जातात. ज्यांना नाटक करायचं असत ते नौटंकी करतात काहीतरी मीडियामध्ये आपली चर्चा  राहिली पाहिजे म्हणून नौटंकी करतात. शरद पवारांना बोलावलं आहे, काँग्रेसला बोलावलं आहे, भाजपाला बोलावलं आहे सर्व तेरा कोटी जनतेचे चौदा पंधरा पक्षांना बोलावलं आहे.त्यामुळे ते नौटंकी करतातं आणि त्याला योग्य उत्तर नितेश राणे देतात. 

[ad_2]

Related posts