( प्रगत भारत । pragatbharat.com)
Cabinet Secretariat Job 2023: भारत सरकारच्या मंत्रिमंडळ सचिवालयात डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेक्निकल) च्या शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. येथे नोकरी मिळालेल्या उमेदवारांना 90 पदानुसार 90 हजारपर्यंत पगार मिळणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयात विविध पदांच्या एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये कॉम्प्युटर सायन्स /आयटीच्या 60, इलेक्ट्रॉनिक्स &/ OR कम्युनिकेशनच्या 48, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 2, गणितच्या 2, सांख्यिकीच्या 2, फिजिक्सच्या 5, केमिस्ट्रीच्या 3 आणि माइक्रोबायोलॉजीची 1 जागा भरली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित विषयात बीई/बीटेक किंवा एमएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 6 नोव्हेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत असावे. एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षांची तर ओबीसी उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना स्तर-07 नुसार दरमहा रुपये 90 हजारपर्यंत पगार दिला जाईल याची नोंद घ्या. उमेदवारांना दिल्ली येथे नोकरी करावी लागेल.
खेळाडूंना एका क्लिकवर नोकरीची संधी, स्पोर्ट्स कोटा भरतीसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू
उमेदवारांनी आपला अर्ज पोस्ट बॅग नंबर 001, लोधी रोड, हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली -110003 या पत्त्यावर पाठवायचा आहे. 6 नोव्हेंबर 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्टाफ नर्स महिलांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असावा. त्याने जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 20 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार नसून थेट मुलाखतीद्वारे ही निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 3 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत आणून द्यावेत. त्याच दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.