Gunratna Sadavarte Filed Petition At Bombay High Court Against Manoj Jarange In Maratha Reservation Know The Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: डॉ. गुणरत्न सदावर्तेंची  ( Gunaratna Sadavarte) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. 8 नोव्हेंबरला याचसंदर्भातील अन्य याचिकांसोबत सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आला आहे. गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव,पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य,मुंबई पोलीस आयुक्त,भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधीक्षक जालना,गोंडीचे पोलीस निरीक्षक,CBI महासंचालक, राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांना याचिकेत प्रतिवादी केलेलं आहे. 216 पानी दाखल याचिकेत सदावर्तेंनी गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र अशांत करून जातीय तेढ वाढविण्याचा  प्रयत्न सुरु आह.  शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा जरांगेंच्या (Manoj Jarange Strike) आंदोलनापाठी असल्याचा आरोप सदावर्तेंनी केला आहे. 

डॉ. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेतील काही ठळक मुद्दे 

 महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन म्हणजेच एसटी महामंडळाच्या अनेक बसेसचे मोठे नुकसान राज्यभर जाळपोळ करून केलंय. सदर कर्मचा-यांना त्या दिवसांचा पगारही मिळालेला नाही. त्याचबरोबर अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालय आणि इतर आस्थापनांवर या हिंसेचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी जबरदस्तीने बंद करण्यात आले जीडीपीचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रात दळणवळणावर परिणाम झाला. गंभीर स्वरूपाचे दाखल गुन्हे मागे घ्या ही सुद्धा अनिष्ट मागणी करण्यात आली. या गोष्टी लक्षात घेता मालमत्तांचे नुकसान करणाऱ्यांकडून वसुली करण्यात आलेली नाही. त्यासोबतच 307 सारखे गुन्हे जे गंभीर अपराधाचे आहेत. सदर गुन्हे वापस घेण्याचे अधिकार सरकारला देखील नाहीत. त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने देखील अनेक वेळेस अशा गंभीर अपराधातील लोकांविरुद्ध कारवाई न करण्याबाबत निरीक्षण नोंदवलेली आहेत.

 सदर आंदोलन संविधानिक मागणी करता नसून, मराठा समाजाला जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं मागास समजले नाही, त्यावेळेस पुन्हा एकदा कायद्याचा भंग करत, लोकांना एकत्रित जमवून आंदोलन करणे हे गैर असून महाराष्ट्रा मध्ये तेड निर्माण करणे, हिंसाचार घडवण्याकरिता जवाबदार असणे, महाराष्ट्रा ला अशांत करणे, जातीय तेड निर्माण करणे, ही पार्श्व भूमी लक्षात घेता जरांगे पाटील हे त्यांच्या साथीदारांसह मिळून  पाठराखे  शरद पवार,  उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसाच प्रयत्न करत असल्याचे पुन्हा दिसते.अद्याप मागील गंभीर गुन्ह्याबाबत जरांगे पाटील आणि त्यांच्या साथीदारांकडून नाहक त्रास सोसणाऱ्या लोकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, तसेच पोलीस अधिकार्यांना नाहक प्रशासकीय कार्यवाहीला राजकीय कारणाने समोर जावे लागले. त्या दिवशीच्या रोजगाराचे पैसे कष्टकऱ्यांना मिळाले नाही आणि व्यावसायिक आस्थापनांना देखील आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सदर झळ हि संपूर्ण महाराष्ट्रात सोसावी लागली.

– तरी आपणास विनंती आहे की दिनांक 14 नोव्हेंबर 2023 पासून जे श्री मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन किंवा जमाव जमावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची मागील पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्राला अशांत करण्याचा हेतू आहे सदर हेतू स्वच्छ नसून काही राजकीय पक्षाच्या लोकांनी मिळून महाराष्ट्राला डिस्टर्ब केल्याचे स्पष्ट आहे. तेव्हा महाराष्ट्रात पुन्हा गाड्यांची तोडफोड जाळपोळ सरकारी मालमत्तांचे नुकसान होऊ नये, हे पाहता श्री मनोज जरंगे पाटील यांना 14 नोव्हेंबर 2023 पासून कोणतीही असविधानिक आंदोलन करण्यास सहभाग घेण्यास मुभा देण्यात येऊ नये. त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना मा. जुडीशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडून योग्य तो आदेश घेऊन पाव बंद करण्यात यावे गरज पडल्यास अटक करण्यात यावी.

[ad_2]

Related posts