Gram Panchayat Election Result Rohit Pawar Amol Kolhe Shahaji Bapu Patil Dilip Walse Patil Lose In Election Maharashtra Election

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राज्यातील तब्बल  2 हजार 359  ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result)  निकाल समोर येत आहे.  यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे,   डॉ.संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात  मोठा धक्का बसला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र ग्रामपंचायतीवर आपापल्या सत्तेचे दावे-प्रतिदावे केले आहेत. 

आमदार रोहित पवारांना धक्का (Rohit Pawar)

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात  जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार यांना धक्का बसला आहे.  कर्जत मतदारसंघातील निकाल जाहीर आहे. कुंभेफळ आणि खेडगावात  भाजपचा सरपंच निवडून आला आहे. तर केवळ एका जागेवर करमणवाडी येथे आमदार रोहित पवार यांच्या समर्थकाचा विजय झाला आहे.

बुलढाण्यात भाजपच्या डॉ. संजय कुटेंना धक्का (Sanjay Kute)    

बुलढाण्यात भाजपच्या डॉ.संजय कुटेंना मोठा धक्का  बसला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली आणि भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. जळगाव जामोद तालुक्यात जामोद ग्रामपंचायत ही भाजपसाठी वर्चस्वाची लढाई होती. मात्र भाजपकडून  ही ग्रामपंचायत  काढून घेत काँग्रेसने जिंकली आहे. 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवत काँग्रेसच्या गंगुबाई दामदर विजयी झाल्या आहेत. 

दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का (Dilip Walse Patil) 

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी धक्के बसलेत. त्यांच्या स्वतःच्या गावात दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः प्रचार करूनही त्यांचा संतोष टावरे हा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला आहे.  तर रवींद्र वळसे पाटील हा शिंदे गटाचा उमेदवार सरपंच म्हणून निवडून आला आहे. तसेच दिलीप वळसे पाटील यांच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ज्या पारगाव गावामध्ये आहेय त्या पारगावमधे दिलीप वळसे यांच्या बाजूच्या सरपंच पदाच्या उमेदवार अर्चना ढोबळे पराभूत झाल्यात तर शरद पवार गटाच्या श्वेता ढोबळे या सरपंच झाल्या आहेत. 

 कोल्हापुरात  15 वर्षाची सत्ता जनसुराज्यने  उलथवून टाकली

 कोल्हापुरात कसबा ठाणे येथं चंद्रदीप नरके गटाला धक्का बसला आहे.  15 वर्षाची सत्ता जनसुराज्यने उलथवून टाकली आहे.  प्राजक्ता पाटील सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का (Vaibhav Naik)   

ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसला आहे. मालवण तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेची ठरलेली आचरा ग्रामपंचायत भाजपकडे आहे. कुडाळ तालुक्यातील वालावल ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले आहे. वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. 

खासदार अमोल कोल्हेंना मोठा धक्का (Dr. Amol Kolhe)

 जुन्नर तालुक्यातील खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आहे. नारायणगाव ग्रामपंचयात मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सत्ता कायम राखली आहे. 17 पैकी 16 उमेदवार  विजयी झाले असून सरपंच पद हे ठाकरे गटाकडे गेले आहे.

सांगोला खवासपूर ग्रामपंचायत शेकाप विजयी , शहाजी बापू धक्का (Shahaji Bapu Patil)

सांगोला तालुक्यातील वाडेगाव ग्रामपंचायत सरपंच पदी शेकपाचे कोमल सुरेश डोईफोडे विजयी झाले आहेत.  सावे ग्रामपंचायत शेकाप विजयी झाले आहेत 

[ad_2]

Related posts