Maharashtra Kesari 2023 Sikander Shaikh Wins Maharashtra Kesari Wrestling Tournament

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sikander shaikh : यावर्षीचा महाराष्ट्र केसरीचा मान पैलवान सिंकदर शेखने पटकावला आहे. गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला चित्रपट करत सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे. मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेखचा सन्मान करण्यात आला. 

पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरु होती. या स्पर्धेतील अखेरची लढत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यात झाली. यामध्ये सिंकदर शेखने मैदाम मारले. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे 42 संघ भिडले. या स्पर्धेत 36 जिल्हा आणि 6 महानगरपालिका असे एकूण 42 संघ सहभागी झाले होते. एका कुस्ती संघात गादी विभागातील 10 आणि माती विभागातील 10 असे एकूण 20 कुस्तीगीर 2 कुस्ती मार्गदर्शक आणि 1 संघ व्यवस्थापक असे एकूण 23 जणांचा सहभाग होता. साधारण या कुस्ती स्पर्धेत 840 कुस्तीगीर 84 कुस्ती मार्गदर्शक आणि 42 व्यवस्थापक, 80  पंच आणि 50 पदाधिकारी असे एकूण 1100 जणांचा सहभाग होता.

 

[ad_2]

Related posts