( प्रगत भारत । pragatbharat.com)
Pizza : पिझ्झा कुणाला आवडत नाही? पिझ्झा आणि बर्गर अतिशय चवीनं खातो. अलिकडच्या पिढीत पिझ्झा आणि बर्गरची क्रेझ इतकी वाढलीय की हे पदार्थ खाल्ल्याशिवाय अनेकांची भूकच भागत नाही. पिझ्झाला मोठी मागणी आहे. पिझ्झा प्रेमींसाठी एक भन्नाट ऑफर आहे. आयुष्यभर मोफत पिझ्झा खा आणि मृत्यूनंतर पैसे द्या. न्यूझीलंडमधील एका कंपनीने ही भन्नाट ऑफर आणली आहे.
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी व्यायसाईक अनेक कृप्त्या लढवतात. न्यूझीलंडच्या एका पिझ्झा चेनने ‘बॉय नाऊ पे लेटर’ अशी भन्नाट ऑफर आणली आहे. कंपीनीची ही ऑफर पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. ही ऑफर काही मर्यादित ग्राहकांसाठी असणार आहे.
काय आहे नेमकी ऑफर?
“आफ्टरलाइफ पे” अशी ही ऑफर आहे. या ऑफरचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना कंपनीमार्फत मोफत पिझ्झा दिला जाणार आहे. या ऑफरचे लाभ घेणारे ग्राहक जिवंत असे पर्यंत त्याने हवे तितके पिझ्झा खाऊ शकतात. याचे पैसे पिझ्झा खाणाऱ्या व्यक्तीच्या मृत्युनंतर वसुल केले जाणार आहे. ही ऑफर केवळ 666 ग्राहकांसाठी आहे.
कसे वसुल करणार पैसे
या ऑफरचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना पिझ्झा कंपनीच्या अधिकृत वेवसाईटवर “आफ्टरलाइफ पे” अंतर्गत नोंदणी करावी लागणार आहे. त्यानुसार आयुष्यभर खालेल्या पिझ्झाचे बिल हे व्यक्तीच्या मृत्यू पत्राशी जोडले जाईल. या द्वारे हे पैसे वसुल केले जाणार आहेत.
पिझ्झा, बर्गरमध्ये डिटर्जंट पावडर?
पिझ्झा आणि बर्गरमध्ये चक्क डिटर्जंट पावडर मिसळली जात असल्याचा दावा करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. बर्गर आणि पिझ्झा सारख्या जंक फूडला नरम ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातोय. सर्वसाधारणपणे या रसायनाचा वापर डिटर्जंट पावडर, सौंदर्य प्रसाधनं आणि डिस्पोजेबल हँड ग्लोव्हजसाठी केला जातो. या रसायनामुळे प्लास्टिकला हवा तसा आकार देतो येतो. या रसायनांचा वापर पिझ्झा आणि बर्गरमध्ये होत असल्यानं अस्थमा, मेंदूविकार असे गंभीर आजार होऊ शकतात. इतकंच नव्हे तर डिटर्जंटयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे प्रजनन क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. पिझ्झा आणि बर्गर तर सारेच जण खातात. या मेसेजमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यानं झी 24 तासनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.
काय सत्य समोर आले?
जॉर्ज वॉशिंग्टन, बोस्टन आणि हॉवर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतात कुठेही डिटर्जंटयुक्त पिझ्झा-बर्गर आढळून आलेलं नाही. यासंदर्भात FDAने देखील कुठलाही अलर्ट जारी केलेला नाही. मात्र तरीही जंक फूड खाताना सर्वांनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. पडताळणीत पिझ्झा आणि बर्गरमध्ये डिटर्जंट मिसळलं जात असल्याचा दावा असत्य ठरलाय. भारतात असा प्रकार कुठेही आढळलेला नाही. केवळ नामांकित कंपन्यांना बदनाम करण्यासाठीच हा मेसेज व्हायरल झाल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे या मेसेजवर विश्वास ठेऊ नका.