Samsung May Launch Affordable Foldable Galaxy Z Smartphone In 2024 Samsung Affordable Foldable Smartphone In Next Year

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Affordable Foldable Smartphone : आयफोन (iPhone) आणि वनप्लस (OnePlus) च्या स्पर्धेच्या जगात सध्या फोल्डेबल फोनची (Foldable Phone) भलतीच क्रेझ वाढली आहे. फोल्ड (Flip Phone) करता येणारे फोन आधुनिक तंत्रज्ञानाचं मोठं पाऊल आहे. फ्लिप फोन ‘भारी’ असले तरी, त्याची किंमतही जास्त आहे. त्यामुळे इच्छा असली तरी, प्रत्येकाला हे फोन परवडत नाहीत. फोल्डेबल फोन घेण्याची इच्छा आहे, पण बजेट नाही, अशा व्यक्तींसाठी खूशखबर आहे. सॅमसंग लवकरच परवडणारा स्वस्त फोल्डेबल फोन लाँच करण्याची शक्यता आहे. सॅमसंग पुढच्या वर्षी मिड-रेंज मार्केटमध्ये फोल्डेबल फोन लाँच करण्याचा विचारात आहे.

सॅमसंग स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करणार

परवडणाऱ्या फोल्डेबल स्मार्टफोमवर काम करत असल्याचं सॅमसंग कंपनीनं सांगितलं आहे. हा फोन पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना फोल्ड करता येणारा फोन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करण्यासाठी सॅमसंग कंपनी प्रयत्न करत आहे. सॅमसंग मिड-रेंज फोल्डेबल फोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. 2024 मध्ये सॅमसंग कंपनीचा स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात येण्याची शक्यता आहे. सॅमसंग लवकरच स्वस्त फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z  लाँच करू शकतो. याची किंमत अवघ्या 30 ते 40 हजारांच्या रेंजमध्ये असेल, असं सांगण्यात येत आहे

फोल्डेबल फोन सॅमसंगची संकल्पना

पहिला फोल्डेबल मोबाईल फोन सॅमसंग कंपनीने बाजारात आणला. सॅमसंगने फ्लिप सीरिज लाँच करत नवा पायंडा रचला. सॅमसंगच्या फोल्डेबर स्मार्टफोन Galaxy Z सीरीजमध्ये Galaxy Z Flip आणि Galaxy Z Fold हे दोन फोन आहेत. यांची किंमत 1000 डॉलर म्हणजे सुमारे एक लाख रुपये आहे.

30 ते 40 हजारांच्या रेंजमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन

एका अहवालात समोर आलेल्या माहितीनुसार, सॅमसंग कंपनी येत्या वर्षात 40 हजारच्या रेंजमधील सर्वसामान्यांना परवडणारा असा फोल्डेबल फोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. माहितीनुसार, या स्मार्टफोनची किंमत सुमारे $400-$500 असू शकते. म्हणजेच या स्वस्त फोल्डेबल मोबाईल फोनची किंमत 33,000  रुपये – 41,000 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 



[ad_2]

Related posts