Whatsapp Is Working On A Feature To Show The Profile Info In Our Chats

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

WhatsApp Profile Info. Update : व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजर्सला (WhatsApp Profile Info. Update) नवनवे फिचर्स देत असतात. त्यांच्या या फिचर्सला सगळे पसंतीदेखील देतात. हेच व्हॉट्सअॅप आता नव्या रुपातदेखील दिसण्याची शक्यता आहे. कंपनी सध्या काही बीटा टेस्टर्ससोबत उपलब्ध असलेल्या एका नवीन फीचरची चाचणी घेत आहे. खरं तर अँड्रॉइड युजर्ससाठी चॅट विंडोमध्ये लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दाखवण्याचं काम कंपनी करत आहे. म्हणजेच नव्या फीचरअंतर्गत तुम्हाला चॅट विंडोमध्ये युजरच्या लास्ट सीनव्यतिरिक्त प्रोफाईल इन्फॉर्मेशन दिसेल. हे फिचर येत्या काही दिवसातच सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. 

व्हॉट्सअॅपच्या नवनव्या गोष्टींवर किंवा फिचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या ‘Wabetainfo’ या वेबसाईटने हे अपडेट शेअर केले आहे. अँड्रॉइड बीटाच्या 2.23.25.11 व्हर्जनमध्ये हे नवे फीचर पाहायला मिळाले आहे. तुम्हालाही आधी कंपनीचे लेटेस्ट फीचर्स मिळवायचे असतील तर तुम्ही कंपनीच्या बीटा प्रोग्रॅमसाठी नोंदणी करू शकता.

नव्या भन्नाट फिचर्सवर काम सुरु…

व्हॉट्सअॅप अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे. अलीकडच्या काळात कंपनीने शॉर्टकट बटण दिले आहेत, जे आपल्याला चॅटजीपीटी सारख्या AIच्या माध्यमातून चॅटबॉट्सशी संवाद साधू शकतात. ग्रुप संभाषणासाठी नवीन व्हॉइस चॅट, अँड्रॉइड आणि आयओएससाठी ईमेल व्हेरिफिकेशन यावरदेखी कंपनीचं काम सुरु आहे. येत्या काळात व्हॉट्सअॅप आपल्याला नवनव्या फिचर्स सोबत मिळणार आहे.

ईमेल लॉगिन फिचर

WB च्या अहवालानुसार, आयफोन युजर्सला SMS द्वारे लॉगिन करण्यात कोणतीही समस्या येत असेल तर ईमेलद्वारे लॉगिन करता येईल. जर आयफोन युजर्सला मेसेज (SMS) द्वारे 6 अंकी कोड ओटीपी मिळवण्यात कोणतीही अडचण येत असेल तर युजर्स ईमेलद्वारे कोड मिळवून त्यांच्या अकाऊंटवर लॉगिन करू शकतात. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, व्हॉट्सॲपने ॲप स्टोअरमध्ये 23.24.70 रिलीझ केलं आहे. 

व्हॉट्सॲपने अद्याप या नवीन फीचरबाबत सविस्तर अधिकृत माहिती दिलेली नाही. पण हे फीचर आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. हे फीचर तपासण्यासाठी युजर्सना सेटिंग्जमध्ये जावं लागेल, त्यानंतर अकाउंट्समध्ये जावं लागेल. दरम्यान, ईमेल लॉगिन फिचर तात्पुरतं आहे. युजर्सना SMS वर ओटीपी मिळवण्यात समस्या येत असल्याच्या तक्रारी मिळाल्याने कंपनीने ही तात्पुरती सुविधा उपलब्ध केल्याचं सांगितलं जात आहे.

इतर महत्वाची बातमी-

Reliance Jio Plan : Jio चा सर्वात स्वस्त 299 रुपयांचा प्लान, 56GB डेटासह इतरही फायदे!

[ad_2]

Related posts