Google Calendar To End Support From These Android Devices

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Google Calender : जर तुम्ही अँड्रॉइड फोन युजर असाल (Google Calender) आणि तुम्ही गुगल कॅलेंडर अॅपचे रेग्युलर युजर असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. गुगल काही जुन्या फोनसाठी गुगल कॅलेंडरसपोर्ट करणे बंद करणार आहे. केवळ अँड्रॉइड फोनच नाही तर आयओएस आणि कॉम्प्युटरवरही गुगल कॅलेंडर सपोर्ट बंद होणार आहे.

गुगल कॅलेंडरचे इंटिग्रेशन जीमेलपासून रिमाइंडर, नोट्स आणि टीम, झूम सारख्या थर्ड पार्टी अॅप्सपर्यंत प्रत्येक गोष्टीत आहे. याच्या मदतीने युजर्स रिमाइंडरसह आपल्या इव्हेंटचे प्लॅनिंग करतात. जर तुमच्याकडे ओरियो म्हणजेच अँड्रॉइडचे 8.0 व्हर्जन असलेला अँड्रॉइड फोन असेल तर तुमच्या फोनमध्ये गुगल कॅलेंडरचा सपोर्ट लवकरच बंद होईल. गुगल कॅलेंडर अँड्रॉइड 8.0 वरील सर्व व्हर्जनला सपोर्ट करेल. जर तुमच्याकडे अँड्रॉइड 7.1 किंवा त्यापेक्षा कमी असलेला टॅबलेट असेल तर त्यात गुगल कॅलेंडर सपोर्टही बंद होईल.

जुन्या अँड्रॉइड व्हर्जनच्या फोन किंवा टॅबमध्ये सॉफ्टवेअर अपडेट मिळत नसल्याने सुरक्षेची समस्या असल्याने काही डिव्हाइसेसमध्ये गुगल कॅलेंडरचा सपोर्ट बंद केला जात असल्याचे सांगितले जात आहे. अशावेळी हॅकिंग आणि डेटा लीक होण्याचाही धोका असतो. व्हॉट्सअॅप दरवर्षी काही डिव्हाइसेसचा सपोर्ट बंद करते. यावेळीही त्याने अनेक अँड्रॉइड आणि आयओएस व्हर्जनचा सपोर्ट बंद केला आहे.

1 डिसेंबरपासून डिलीट होतील ‘हे’ Gmail अकाऊंट्स

गुगल 1 डिसेंबर 2023 पासून Gmail अकाऊंट (Gmail Account ) बंद करणार आहे. गुगलने 1 डिसेंबर 2023 पासून इनएक्टिव अकाऊंट पॉलिसी लागू करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही Gmail युजर्स असाल आणि गेल्या 2 वर्षांपासून जीमेल अकाऊंट वापरत नसाल तर सर्व जीमेल अकाऊंट्स बंद करण्यात येणार आहे. तसेच जीमेल, फोटो आणि ड्राइव्हची कागदपत्रे बराच काळ वापरली गेली नसतील तर तो डेटादेखील डिलीट होणार आहे. त्यामुळे जर तुमचं एखादं जुनं अकाऊंट असेल जे तुम्ही आता वापरत नाही. तर त्या अकाऊंटमधील सर्व डेटा आजच सेव्ह करुन घ्या. जर तुम्ही बराच काळ गुगल अकाऊंटमध्ये लॉग इन केले नसेल तर तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. जर तुम्ही सतत जीमेल वापरत असाल तर तुम्ही जीमेलचे अॅक्टिव्ह युजर्स आहात, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. अशा व्यक्तीचे जीमेल अकाऊंट डिलीट केले जाणार नाही आहे. 

इतर महत्वाची बातमी-

WhatsApp Profile Info Update : Whatsapp मध्ये आता भन्नाट फिचर; Last Seen सोबतच दिसणार Profile Information

[ad_2]

Related posts