( प्रगत भारत । pragatbharat.com)
Brother Sister Marriage : प्रत्येक नात्यात प्रेम हा पाया असतो. वडील आणि मुलीच्या नात्यानंतर जर कुठलं नातं पवित्र असेल तर ते बहीण भावाचं असतं. मोठा भाऊ हा वडिलांच्या जागी असतो तर मोठी बहीण असेल तरी आईच्या जागी असते. आजकाल प्रेम नेमकं काय असतं आणि ते कोणावर करायचं आणि कोणावर नाही याचा प्रश्नच पडतो. समाजात काही नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि लग्न होऊ शकतं नाही. पण गेल्या काही काळापासून विचित्र घटना समोर येतं आहेत. ज्यामध्ये सासूचं जावयासोबत संबंध, सूने सासरे अनैतिक संबंध, काकू पुतण्याचं अफेयर अशा अनेक घटना ज्या आपल्याला ऐकून आपल्याला धक्का बसतो. (We love each other very much sister married brother trending viral news)
‘आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो’
शास्त्रानुसार रक्ताच्या नात्यात लग्न होतं नाही, कारण रक्ताच्या नात्यामुळे पुढील पिढीत जनुकीय दोष निर्माण होण्याची भीती असते. मात्र एका विचित्र घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका बहीण भावाने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकन जोडपे डेटिंग करत होते. ते प्रेमात पडले आणि काही काळानंतर त्यांना कळलं ते बहीण भाऊ आहेत. ही लव्हस्टोरी तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ती तरुणी म्हणाली आम्ही जरी नात्याने बहीण भाऊ असो तरी त्यांना काही फरक पडत नाही कारण ते एकमेकांवर खूप प्रेम करतात.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण अमेरिकेतील उटाहमधील आहे. 20 वर्षीय टिकटोकर केन्ना हिने व्हिडीओ शेअर करत आपली प्रेम कहाणी सांगितली आहे. ती म्हणाली की तिने तिच्या चुलत भावाशी लग्न केलं आहे. ती म्हणाली की, 6 महिन्यांच्या डेटिंगनंतर तिला डीएनए चाचणीतून कळलं की दोघेही चुलत भावंड आहेत. indy100 च्या रिपोर्टनुसार, या अहवालानंतरही त्यांच्या प्रेमात बदल झाला नाही तर त्यांनी एक वर्षानंतर लग्न केलं.
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल!
तरूणीची लव्ह स्टोरी ऐकून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या जोडप्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांना बहीण भावाचं हे लग्न मान्य नाही. हे नातं बेकायदेशीर असून भविष्यात अशी नाती जेनेटिक्स बिघवणार अशी भीती नेटकऱ्यांनी उपस्थित केली आहे. ट्रोल झाल्यानंतर तरुणीने अजून एक व्हिडीओ शेअर केला ज्यामध्ये जोडपे एकमेकांना मीठी मारताना आणि किस करताना दिसत आहेत.
दरम्यान युटा हे अमेरिकेतील 24 राज्यांपैकी एक आहे जिथे चुलत भावंडांमधील विवाहावर बंदी आहे. तर न्यूयॉर्क आणि फ्लोरिडासह इतर 19 ठिकाणी अशा लग्नाला परवानगी आहे.