दुकानांवर मराठी फलक न लावणाऱ्यांवर कारवाई

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईत मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मुंबई महापालिकेने दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. यानंतर या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी मुंबई महापालिकेने 161 दुकानांवर कारवाई केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता 28 नोव्हेंबरपासून मुंबई महापालिका क्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठीत नेमप्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनांची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने बुधवारी 3 हजार 575 दुकाने आणि आस्थापनांना भेटी दिल्या.

या भेटीदरम्यान महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी 161 दुकानांवर कारवाई केली.दुकानांवर कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी काल मंगळवारी 3 हजार 269 दुकाने आणि आस्थापनांना भेटी दिल्या. या कारवाईदरम्यान महापालिका प्रशासनाच्या पथकाने 176 दुकानांवर कारवाई केली. गेल्या दोन दिवसांत प्रशासनाच्या पथकांनी 337 दुकानांवर कारवाई केली.

पुढील काळातही ही कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच मुंबईतील सर्व दुकानांवर मराठीत नावाचे फलक लावण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.


हेही वाचा

मराठी फलक लावण्यावरून मुंबईतील १७६ दुकानांवर कारवाई


28 नोव्हेंबरपासून मराठी साइन बोर्ड नसतील ‘ही’ कारवाई होणार

[ad_2]

Related posts