Germs On The Laptop Screen And Keyboard As On The Toilet Seat Clean Them Like This No Part Will Be Harmed

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

How To Clean Laptop Keyboard : दिवभर लॅपटॉवर काम करत असतो. लॅपटॉप समोर ठेवूनच आपण कॉफी पितो किंवा स्नॅक्स खातो. त्याचबरोबर (Clean Laptop Keyboard) अनेकवेळा तुम्ही किंवा तुमचे सहकारी खोकतात, शिंकतात आणि तुमच्याशी हात मिळवतात. अशावेळी तुम्ही हात स्वच्छ न करताच लॅपटॉपवर काम करता. ज्यामुळे सर्व जंतू तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रिनवर किंवा किबोर्डवर जमा होतात. हे जंतू स्वच्छ करायचे असतील तर आम्ही तुम्हाला लॅपटॉपची स्क्रीन आणि कीबोर्ड स्वच्छ करण्याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपचं अजिबात नुकसान होणार नाही… 

लॅपटॉपचा की-बोर्ड कसा स्वच्छ कराल?

  • लॅपटॉप साफ करायला सुरुवात करण्यापूर्वी मायक्रोफायबरच्या कापडात थोडं पाणी टाका.
  • त्यानंतर सर्वप्रथम लॅपटॉपची स्क्रीन स्वच्छ करा.
  • त्याचबरोबर स्क्रीन साफ करताना जास्त दाब लावण्याची गरज नाही.
  • आपल्या मायक्रोफायबर टॉवेलवर फक्त थोड्या प्रमाणात पाणी वापरा.
  • जास्त पाणी लागल्यास यामुळे लॅपटॉपच्या आत जाऊन तुमच्या लॅपटॉपचा मदरबोर्ड खराब होऊ शकतो.
  • लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी कधीही ब्लीच आणि अमोनिया वापरू नये.
  • त्याचबरोबर जर तुम्ही दररोज साध्या कापडाने लॅपटॉप स्वच्छ केला तर तुमचा लॅपटॉप बराच काळ स्वच्छ राहू शकतो.
  • अनेकदा आपल्या अन्नाचे छोटे कण लॅपटॉपच्या कीबोर्डच्या आत जातात.
  • ब्लोअर वापरून लॅपटॉपचा कीबोर्ड स्वच्छ करू शकता.
  • लॅपटॉपची स्क्रीन आणि कीबोर्ड साफ करून चालणार नाही.
  • आपण आपल्या लॅपटॉपचे चार्जिंग पोर्ट, यूएसबी पोर्ट आणि ऑडिओ पोर्ट देखील वेळोवेळी ब्रश केले पाहिजे.

लॅपटॉपचा स्पिड वाढवा…

तुमच्या लॅपटॉपमध्ये असणारे सर्व सॉफ्टवेअर्स अपडेट आहेत की नाही याची खात्री करा आणि यासोबतच तुमच्या लॅपटॉपचीदेखील नियमितपणे देखभाल करा. त्यासोबतच लॅपटॉपच्या हिटवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॅपटॉप चार्ज करतेवेळी लॅपटॉपचा वापर करणे शक्यतो टाळावं. यासोबतच आपण ज्याठिकाणी लॅपटॉप ठेऊन काम करतो त्याठिकाणी लॅपटॉपसाठी पुरेशी मोकळी हवा किंवा पुरेस थंड वातावरण असणे गरजेचे आहे. यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीचे आयुष्य वाढते आणि या सोबतच दुसरी कोणतीही समस्या येत नाही. तुमच्या सिस्टमला व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या लॅपटॉप किंवा कॅम्पुटरमध्ये अँटीव्हायरस असणे आवश्यक आहेत. जेणेकरून तुमच्या सिस्टिमला जास्तीत-जास्त संरक्षण मिळू शकते आणि याद्वारे तुमचा लॅपटॉप व्हायरसपासून सुरक्षित राहू शकतो. तर आपला व्हायरस अद्ययावत आहे कि नाही याचीदेखाल  खात्री आपण करून घ्यायला हवी. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

Tips for using Geyser : बॉम्बसारखा फुटू शकतो तुमचा गिझर; चुकूनही करू नका ‘या’ तीन गोष्टी

[ad_2]

Related posts