Poll Of Exit Polls Results 2023 Live Abp C Voter Survey India Today Aaj Tak Axis CNX Times Now ETG Jan Ki Baat TV 9 Bharatvarsh Republic TV Rajasthan Mp Chhatisharh Telangana Assembly Election Results 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Poll Of Exit Polls Results 2023 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरू असून 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. खरंतर ही निवडणूक जरी विधानसभेची (Assembly Election Results) असली तरी ही लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) रंगीत तालीम असल्याचं समजलं जातंय. या पाच राज्यांच्या निवडणुकांत उडालेला धुरळाच, लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला विजयाचा गुलाल लावणार आणि कुणाला धूळ चारणार हे ठरवू शकेल. म्हणूनच, एबीपी माझा आणि सी-वोटरने या पाच राज्यांचा सर्वात मोठा, सर्वात लक्षवेधी आणि सर्वात अचूक असा एक्झिट पोल केला.

या एक्झिट पोलमध्ये अनपेक्षित, आश्चर्यकारक आणि धक्कादायक अशा तिहेरी हिंदोळ्यांवर झुलणारे अंदाज समोर आले आहेत. राजस्थानच्या गळ्यात भाजपच्या कमळाचा हार पडणार असल्याचं चित्र आहे आणि राजस्थान काँग्रेसचा हात सोडणार, असा अंदाज सर्व्हेतून समोर आलाय. तर तिकडे मध्य प्रदेशातलं भाजपचं कमळ यावेळी कोमेजणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तेलंगणात मात्र काँग्रेस कडवी झुंज देत, महाराष्ट्रात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात असलेल्या, चंद्रशेखर राव यांना चारीमुंड्या चीत करणार, असं सर्वेक्षण सांगतंय. महत्त्वाचं म्हणजे, 2018 साली काँग्रेसचा पकडलेला हात, छत्तीसगड यावेळीही घट्ट पकडून ठेवणार, असा सर्व्हेचा अंदाज आहे.  

या पाच राज्यांमध्ये तुलनेने लहान राज्य असलेल्या मिझोरामने गेल्यावेळी एमएनएफला चांगली साथ दिली होती, यावेळी मात्र मिझोरामने त्रिशंकू कौल देत, बुचकाळ्यात टाकण्याचा कौल दिल्याचं सर्व्हेतून समोर आला आहे. एबीपी माझा आणि सी-वोटरच्या सर्व्हेचा सार काढायचा झाला तर, पाचपैकी एका राज्यांत भाजप आणि तीन राज्यांत काँग्रेस विजयाचा झेंडा रोवणार आहे. तर एका राज्यात त्रिशंकू स्थिती असेल असं सर्व्हेक्षणातून समोर आलंय.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोल अंदाज  (India Today Aaj tak Axis Exit Poll) 

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करणार आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, राज्यात काँग्रेसला 90 पैकी 40-50 जागा मिळू शकतात. त्याचवेळी भाजपला 36-46 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोल अंदाज (India TV CNX Exit Poll)

इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलनुसार, मिझो नॅशनल फ्रंट पार्टी मिझोराममध्ये 14-18 जागा जिंकू शकते. काँग्रेसला 8-10 जागा, झेडपीएमला 12-16 जागा, भाजपला 0-2 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये भाजपला 41 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे आणि काँग्रेसला एकूण 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. 

जागांच्या बाबतीत, छत्तीसगडमध्ये भाजपला 30-40 जागा, काँग्रेसला 46-56 आणि इतरांना 3-5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

तेलंगणात बीआरएसला 31-47 जागा, काँग्रेस+ 63-79 जागा, भाजपा+ 2-4 जागा आणि एआयएमआयएमला 5-7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मिझोरममध्ये, MNF ला 14-18 जागा, ZPM 12-16 जागा, कॉंग्रेस 8-10 आणि भाजपा 0-2 जागा मिळतील असा अंदाज आहे.

टाईम्स नाऊ-ईटीजी एक्झिट पोल अंदाज (Times Now ETG Exit Poll)

टाईम्स नाऊ-ईटीजीच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन होण्याची अपेक्षा आहे. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये भाजपला 108 ते 128 जागा, काँग्रेसला 56 ते 72 जागा आणि इतरांना 13 ते 21 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये भाजपला 32 ते 40 आणि काँग्रेसला 48 ते 56 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याच सर्वेक्षणानुसार, मिझोरममध्ये, MNF ला 14-18 जागा मिळतील, ZPM ला 10-14 जागा मिळतील, कॉंग्रेसला 9-13 जागा मिळतील आणि भाजपला 0-2 जागा मिळतील.

जन की बात एक्झिट पोलचे अंदाज (Jan Ki Baat Exit Poll)

जन की बात एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला 95 ते 115 जागा आणि काँग्रेसला 105 ते 120 जागा मिळू शकतात. मतदानाच्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये भाजपला 34-45 जागा आणि काँग्रेसला 42-53 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये भाजपला 100-122 तर काँग्रेसला 62-85 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, तेलंगणामध्ये BRS 40-55 जागा मिळवू शकतात, काँग्रेस+ 48-64 जागा मिळवू शकतात, भाजपा+ 7-13 जागा मिळवू शकतात आणि AIMIM ला 4-7 जागा मिळू शकतात. तर मिझोराममध्ये, जन की बात मतदानाच्या आकडेवारीनुसार, MNF ला 10-14 जागा मिळू शकतात, JPM ला 15-25 जागा मिळू शकतात, कॉंग्रेसला 5-9 जागा आणि भाजपला 0-2 जागा मिळू शकतात.

न्यूज 24-आजका चाणक्य एक्झिट पोल अंदाज ( News 24 Exit Poll)

न्यूज 24-टूडेज चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला 151 जागा आणि काँग्रेसला 74 जागा मिळू शकतात. या मतदानाच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला 33 आणि काँग्रेसला 57 जागा मिळू शकतात.

TV 9 भारतवर्ष-पोलस्ट्रॅट एक्झिट पोल अंदाज (TV 9 Bharatvarsh Pollstrat Exit Poll)

टीव्ही 9 भारतवर्ष-पोलस्ट्रेटच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला 106-116 जागा आणि काँग्रेसला 111-121 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, राजस्थानमध्ये भाजपला 100-110 आणि काँग्रेसला 90-100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी, छत्तीसगडमध्ये भाजपला 35-45 जागा आणि काँग्रेसला 40-50 जागा मिळू शकतात. तेलंगणात बीआरएसला 48-58 जागा, काँग्रेस+ 49-59 जागा, भाजपा+5-10 जागा आणि एआयएमआयएमला 6-8 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिस एक्झिट पोल अंदाज (Republic TV Matris Exit Poll)

रिपब्लिक टीव्ही-मॅट्रिसच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला 118-130 जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला 97-107 जागा मिळू शकतात. छत्तीसगडमध्ये भाजपला 34-42 जागा आणि काँग्रेसला 44-52 जागा मिळू शकतात. तेलंगणात बीआरएसला 46-56 जागा, काँग्रेस+ 58-68 जागा, भाजपा+ 4-9 जागा आणि एआयएमआयएमला 5-7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलचा अंदाज ( Dainik Bhaskar Exit Poll)

दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला 95-115 जागा आणि काँग्रेसला 105-120 जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, छत्तीसगडमध्ये भाजपला 35-45 जागा आणि काँग्रेसला 46-55 जागा मिळू शकतात.

P-MARQ च्या एक्झिट पोलनुसार, राजस्थानमध्ये भाजपला 105-125 जागा आणि काँग्रेस+ला 69-91 जागा मिळू शकतात.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts