[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Indira Gandhi Pension Yojana : दारिद्रय रेषेखालील असणाऱ्या 65 वर्षावरील व्यक्तींसाठी केंद्र सरकारनं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना (Indira Gandhi Pension Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाते. सरकारची ही योजना, तुमच्या आजूबाजूच्या निराधार आजी-आजोबांना महिन्याला पैसे मिळवून देणारी आहे. जाणून घेऊयात या योजनेबद्दल सविस्तर माहिती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लाभार्थी 65 वर्षांवरील निराधार वृद्ध असणं गरजेचं आहे.
‘या’ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
विहीत नमुन्यातील अर्ज
वयाचा दाखला – किमान 65 वर्ष
दारिद्रय रेषेचा दाखला (कुटुंबाचे नाव ग्रामीण/ शहरी भागाच्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे).
किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी
आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स
रहिवासी दाखला
अर्जदाराचा फोटो
काय लाभ मिळेल?
अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 लाभ
अर्ज कुठे करावा
तहसील कार्यालय, सेतु केंद्र, https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate
[ad_2]