Pune Accident News : Three Members Of Same Family Dead In Accident On Pune Nashik Highway Near Manchar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Accident News)  अपघात काही संपायचं नाव घेत नाही आहे. आज पुन्हा एकदा पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बायपासला भीषण अपघात झाला आहे. यात अपघातात तीन जणांचा जागेवर मृत्यू  झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. 3 जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात तर 2 जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

नाशिकहून भोसरीच्या दिशेने जाणाऱ्या जीपने ट्रकला धडक दिल्याने पहाटे भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, जीपचा पुढचा भाग चिरडला गेला आहे. समोरचा ट्रक जीप चालकाला धुक्यामुळे दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

या अपघातात जीपमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. याशिवाय पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक प्रशासन आणि आपात्कालीन सेवांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं आणि जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली आहे. 

पुणे नाशिक महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं

पुणे नाशिक महामार्गावरील अपघाताचं प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील शिरोली फाट्याजवळ भीषण अपघात झाला होता. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडली होती. यात पाच महिलांचा  मृत्यू झाला होता. 13 महिलादेखील जखमी झाल्या होत्या. एका लग्नकार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटवरून पीएमपीएमएल बसने खेड तालुक्यात आल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या, मात्र अंधारात त्यांना महामार्ग ओलांडायचा होता. पुण्याच्या दिशेने आलेल्या चारचाकीने आधी एका महिलेला धडक दिली होती. त्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि इतर सात महिलांना ही त्याने धडक दिली होती. यात दुर्दैवाने पाच महिलांना जीव गमवावा लागला होता. 

अपघात कधी थांबणार?

पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेग, रस्ते या अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आतापर्यंतच्या अपघातातून समोर आलं आहे. योग्य उपाययोजना राबवून हे अपघात रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.

महत्वाच्या इतर बातम्या  :

पत्नीने चिकन न दिल्याने पतीने रागाच्या भरात लहान मुलीच्या डोक्यात घातली वीट, पुण्यातील पाषाण येथील घटना

[ad_2]

Related posts