Worker Brought Home Leopard Cubs Mistaking Kittens What Happened Next Know Here Dhule News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhule Leopard News : मांजरीची पिल्ले समजून शेतकऱ्याने बिबट्याची पिल्ले घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे तालुक्यातील नाणे सिताने या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेतार काम करताना मजुरांना दोन पिल्ले दिसली. गोंडस मांजरीच्या पिल्लांसोबत मुलांचं मन रमलं त्यामुळे मजुरांनी ही पिल्ले  शेतातून घरी आणली. पण, ही पिल्ले मांजराची नसून बिबट्याची असल्याचं समजताच त्यांना धक्का बसला.

मांजरीची पिल्ले समजून घरी आणली बिबट्याची पिल्लं

दरम्यान, ही बाब लक्षात येताच ज्या ठिकाणाहून ही पिले आणण्यात आली होती, त्याच ठिकाणी त्यांना सोडलं. जंगलात सापडलेल्या जागी पिल्लांना ठेवल्यानंतर पिल्लांच्या आईने मुलांसह रात्री हे ठिकाण सोडल्याचा प्रकार वनविभागाच्या कॅमेरात कैद झाला आहे. 

बिबट्याची पिल्लांसोबत खेळली मजुरांची मुलं

धुळे तालुक्यातील नाणे सिताने येथील शेतकरी काशिनाथ माळी यांच्या शेतातील मजुरांना दोन पिले आढळून आली. या पिलांना घेऊन ते काशिनाथ माळी यांच्या शेतातील शेडमध्ये घेऊन आले. या पिलांबरोबर या मजुरांची मुले काही वेळ खेळली. मात्र, शेतमालक काशिनाथ माळी हे सकाळी शेतात आल्यानंतर त्यांना ही बिबट्याची पिले असल्याचे लक्षात येताच त्यांनी याबाबत वनविभागाला तात्काळ कळविलं.

पुढे काय झालं?

वनविभागाने ही पिल्ले ज्या ठिकाणाहून आणली हो,ती त्याच ठिकाणी ठेवल्यानंतर या ठिकाणी बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा लावण्यात आला. रात्रीच्या सुमारास एक मादी बछड्यांजवळ आली. या मादीने आजूबाजूची चाहूल घेत ती पसार झाली. यानंतर पुन्हा पहाटे दोन वाजेच्या सुमारास ती बछड्याजवळ येऊन त्यांना घेऊन जंगलात घेऊन पसार झाल्याची घटना वनविभागाच्या कॅमेरात कैद झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

[ad_2]

Related posts