[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जेजुरी बाहेरील विश्वस्तांची मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त पदी नियुक्ती केल्याप्रकरणी जेजुरीकरांचं धरणे आंदोलन गेल्या ९ दिवसांपासून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन या शिस्तमंडळनं त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी जेजुरीच्या आंदोलकांना पाठिंबा दिलाय. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढावा अशी विनंती आता राज ठाकरे करणार असल्याची माहिती आहे.</p>
[ad_2]