Baby Shower Of Cow In Shetphal Village Dohale Jevan Celebration Of Cow In Karmala Solapur Maharashtra Solapur News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Solapur News : आई होणं ही महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचं कोड कौतुक करत असतात. पण करमाळा तालुक्यात एका शेतकऱ्याने लाडक्या गायीचं डोहाळ जेवण (Baby Shower) धूमधडाक्यात केलं आहे. या अनोख्या डोहाळ जेवणाची पंचक्रोशीत चर्चा आहे. गायीला आपण गोमाता म्हणतो त्याच गाईचे चक्क डोहाळे पुरवित डोहाळ जेवणाचा अनोखा सोहळा करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील एका शेतकऱ्याने केला. यानिमित्ताने सगळ्या गावाला जेवण घालून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. ” हौसेला मोल नसते,” म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर, खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही आणी हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका. अशाच एक शेटफळ येथील हौशी शेतकरी परमेश्वर गोरख पोळ यांनी चक्क आपल्या लाडक्या गायीच्या डोहाळ जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. या निमित्ताने त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले. तसेच गावातील सर्व महिलांना आपल्या शेतातील गोठ्यावर बोलवून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला.

यावेळी एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो, अशाच प्रकारे सर्व रितीरिवाज पार पडले. गोठ्यात मंडप घालण्यात आला, यामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आले होते. गायीला सजवून ओवाळण्यात आले. सर्वांचे गायीसोबत फोटो सेशन झाले. गायीला हिरवा चारा पंचपकवानाचे जेवण घालण्यात आले . आलेल्या सर्व पाहुणे मंडळी महिला व ग्रामस्थांनाही जेवणाचा बेत करण्यात आला होता. नंतर गावातील भजनी मंडळींचा भजनाचा कार्यक्रम झाला. गायीच्या या अनोख्या डोहाळ जेवणाची चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे.

ॠणातून काही प्रमाणात उतराई होण्याचा प्रयत्न

परमेश्वर गोरख पोळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, गावातील एका नातेवाईकाने चार-पाच वर्षांपूर्वी गावरान गायीची छोटी कालवड आम्हाला सांभाळण्यासाठी दिली. तिला आम्ही उत्तम प्रकारे सांभाळली. आमच्या सर्व घरादाराला तिचा चांगलाच लळा लागला आहे. आतापर्यंत तिने दोन वेत दिले. दुधही भरपूर देते. आमची गाय फारच गुणवान आ.हे आमच्या घरातील एक सदस्यच बनली आहे. आमच्याकडे ती आल्यापासून आमच्या घरात लक्ष्मी नांदू लागली, अशी आमची श्रद्धा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला देव मानलं आहे. तिचाही सन्मान व्हावा आणि तिच्या ॠणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता.

[ad_2]

Related posts