[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ठाणे : ठाणे (Thane) जिल्ह्यातील देसाई गाव येथे राहणारा प्रेम देवकर (Prem Devkar) याला वयाच्या बाराव्या वर्षापासून क्रिकेट (Cricket) खेळण्याची आवड निर्माण झाली. अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी (Batsman), फलंदाजी (Bowler) असल्याने त्याची चर्चा जिल्हाभर होत असे. देसाई या छोट्या गावामध्ये देखील घरोघरी प्रेमच्या खेळाची चर्चा होत होती. प्रेमच्या मित्रानेच एक दिवस किराणा दुकान चालक असलेले त्याचे वडील यांना प्रेमच्या क्रिकेटच्या खेळा विषयी माहिती दिली आणि वडिलांनी कुठलाही विलंब न करता त्याला डोंबिवलीतील (Dombivali) एका क्रिकेट क्लब मध्ये क्रिकेटच्या सरावासाठी भरती केले. त्यानंतर मुंबईतील वांद्रे (Bandra) येथे त्याचा क्रिकेट सराव सुरू झाला आणि लहान असल्यामुळे त्याला डोंबिवली ते वांद्रे हा प्रवास जिकरीचा ठरत होता. तरीही जिद्द न सोडता क्रिकेटचा सराव तो करत राहिला आणि आज त्याचे फळ प्रेम देवकरला मिळाले. याचे सर्व श्रेय प्रेम हा त्याच्या आई-वडिलांसह कुटुंबातील काका काकी मोठा भाऊ यांना देत आहे. भावामुळेच क्रिकेटर बनण्याचा मान मिळाला मोठ्या भावाला थँक्यू अशा शब्दात प्रेमने त्याच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन केले.
यावेळी मोठ्या भावाचे का आभार मानले या विषयी देखील प्रेमने सांगितलं. मला लेदर बॉलने क्रिकेट खेळायचे आहे, याबाबत मी माझ्या मोठ्या भावाला सांगितले. त्यानंतर मोठ्या भावाने वडिलांची चर्चा करून प्रथम डोंबिवलीमध्ये क्रिकेटच्या सरावासाठी भरती केले. डोंबिवलीमध्ये खेळत असताना खेळायची संधी मिळत नसल्याने वयाच्या अठराव्या वर्षी तो मुंबईतील वांद्रे येथे क्रिकेट सरावासाठी गेला. येथे क्रिकेट प्रशिक्षण गायतोंडे यांच्यामुळे प्रेम क्रिकेटर बनला. सराव सामने खेळता खेळता एमसीए ट्रायल मॅच डोंबिवली येथे पार पडली. या ठिकाणी प्रेमची निवड झाली.
असा सुरु झाला क्रिकेटचा प्रवास (Prem Devkar Cricket Journey)
19 वर्षीय वयोगटातील निवडीमध्ये 30 खेळाडूंमध्ये निवड झाली मात्र खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर प्रशिक्षकांच्या मदतीने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची मुंबईच्या संघासाठी निवड झाली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात प्रेमने सहा विकेट घेतल्या. यानंतर त्याची निवड मुंबई संघात झाली तेथे देखील त्यांने उत्कृष्ट गोलंदाजी केली. नऊ सामन्यांमध्ये 18 विकेट्स प्रेमने घेतल्या. त्यामुळे संघाचे नेतृत्व करणाऱ्या प्रशिक्षकांना त्याचा खेळ आवडल्यामुळे त्याची निवड थेट 19 वर्षीय वयोगटातील इंडियन ट्रायल क्रिकेट सामना खेळण्यासाठी झाली. त्यानंतर बांगलादेश इंग्लंड यांच्यासोबत सामना खेळला आणि या खेळानंतर आता प्रेम चाललाय भारतीय संघाकडून दुबईमध्ये. प्रेम हा वयाच्या बाराव्या वर्षापासून क्रिकेट खेळायला लागला. त्याने मोहम्मद शमी बुमराह यांचा खेळ पाहून तो त्यांच्या खेळाची देखील नक्कल करत असे. रोहित शर्मा मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह प्रेमचे आयडल असल्याचं यावेळी त्याने सांगितले. भारतीय संघात निवड झाल्यामुळे देसाई गावातील नागरिकांसह कुटुंबातील नातेवाईक यांना प्रेमचा अभिमान वाटू लागला आहे.
क्रिकेट प्रशिक्षकांचे मार्गदर्शन (Prem Devkar Cricket Coach)
प्रेमचे वडील संतोष देवकर हे गावामध्ये किराणा दुकान चालवतात. दुकानांमध्ये काही प्रेमचे मित्र आले आणि त्यांनी प्रेमच्या खेळाबद्दल त्यांना माहिती दिली. प्रेमच्या वडिलांनी कुठलाही विलंब न करता त्याला क्रिकेट क्लबमध्ये भरती केले. त्यानंतर मुंबई येथे घेऊन भारतीय संघामध्ये करण्यात आली. डोंबिवलीत त्याचा खेळ चांगला होणार नाही याची कल्पाना आली. त्यामुळे आम्ही त्याला वांद्रे येथे गायतोंडे सरांकडे प्रशिक्षणासाठी पाठवले. त्यावेळी प्रेम गायतोंडे सरांनी एक ओव्हर टाकण्यास सांगितली त्यानंतर त्याचा खेळ गायतोंडे सरांना आवडला. त्यावेळी प्रेमच्या खेळामध्ये काही त्रुटी देखील होत्या. परंतु त्यामध्ये सुधारणा करत प्रेम हा आता भारतीय संघात खेळणार आहे.
कुटुंबाचा आनंद गगनात मावेना (Prem Devkar Family)
त्यावेळी गायतोंडे सरांनी सांगितले की तू चांगला खेळाडू आहेस उद्यापासूनच तू आमचा क्लब जॉईन कर. प्रेम हा जलद गतीचा गोलंदाज असल्याने गोलंदाजी करत असताना पाठीमध्ये चमक भरायचीय असायची त्यामुळे पाठीत निघणाऱ्या चमकीवर अनेक उपचार केले. निघणाऱ्या चमकीवर अनेक उपचार केले मात्र त्याला काही फरक पडला नाही. त्यामुळे गायतोंडे सरांनी प्रेमच्या गोलंदाजी मध्ये बदल केला आणि पाठीतली चमक थांबली. प्रेमच्या वडिलांची फार मोठी अशी काही इच्छा नव्हती. त्याने मुंबईच्या संघात जरी खेळ खेळला तरी त्यांना अभिमान वाटणार होता. पण आता त्याची निवड थेट भारतीय संघात झालीये. त्यामुळे वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.
क्रिकेट खेळायची आवड असल्यामुळे प्रेमला सकाळी पाच वाजता उठावे लागत होते. त्याचं जेवण करावं लागत असल्याची माहिती प्रेमच्या आईने दिली. आता स्वतःचा मुलगाच टीव्हीवर दिसणार असल्याने आईला खूप अभिमान वाटत आहे. दरम्यान प्रेमला त्याची आजी ममता देवकर हीने देखील या संपूर्ण प्रवासात प्रोत्साहित केलं. प्रेमची निवड झाली त्यावेळी आजीला देखील आनंदाअश्रू अनावर झाले. प्रेमचे आजोबा जयदास देवकर यांनी देसाई गावात असलेल्या प्रेमच्या घराच्या बाजूलाच एक छोटेसे मैदान बनवले आहे. या मैदानावर प्रेम क्रिकेटचा सराव करत असायचा. त्यावेळी प्रमचे काका त्याला गोलंदाजी करायचे आणि त्याला क्रिकेटच्या शिक्षणाचे धडे देत असायचे.
मोठ्या भावाची मोलाची साथ
प्रेमच्या मोठ्या भावाने त्याला या संपूर्ण प्रवासात अत्यंत मोलाची अशी साथ दिली आहे. दरम्यान प्रेम हा त्यांच्या परिसरामध्ये अग्रेसर खेळाडू होता, अशी भावना प्रेमच्या भावाने यावेळी व्यक्त केली. प्रेम आता अंडर 19 भारतीय संघात खेळणार आहे. त्यामुळे त्याच्या भावासाठी देखील हा अत्यंत अभिमाना क्षण आहे.
प्रेमच्या यशाच्या वाट्यात अनेकांचा हातभार आहे. त्यामुळे भारतीय संघातील एक नवोदित खेळाडू म्हणून प्रेम लवकरच नावारुपाला यात काही शंका नाही.
हेही वाचा :
मुंबई बदलताना! तिचं स्वरुप बदललं पण स्वभाव नाही, अशी बदलत गेली ‘मायानगरी’
[ad_2]