Oppo Mobile Phone Oppo Reno 11 Pro Price Features Specification In India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

OPPO Reno 11 Pro Features :  ओप्पोने आपली रेनो सीरिज नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये लाँच केली होती. त्यांचा ओप्पो रेनो 11 नुकताच टीडीआरए, बीआयएस, एफसीसी  (OPPO Reno 11 Pro Features)आणि गीकबेंच वेबसाइटवर लाँच करण्यात आला होता. तर आता ओप्पो रेनो 11 प्रोला एनबीटीसी, बीआयएस, सिरिम आणि एसडीपीपीआय सर्टिफिकेशन मिळालं आहे. या फोनचे भारत आणि ग्लोबल लाँचिंग लवकरच होणार असल्याची माहिती आहे. चीनमध्ये लॉंच झालेल्या फोनचे स्पेसिफिकेशन्सचे जाणून घेऊया…

ओप्पो रेनो 11 प्रो ला एनबीटीसी प्रमाणपत्रावर CPH2607 मॉडेल क्रमांकासह पाहिले गेले आहे. या लिस्टिंगमध्ये डिव्हाइस 5G नेटवर्क सपोर्ट फिचर असल्याचं सांगितलं जात आहे. रेनो 11 प्रोच्या सिरिम, बीआयएस आणि एसडीपीपीआय लिस्टिंगबद्दल बोलायचे झाले तर त्यात फक्त मॉडेल नंबर समोर आला आहे. आयएमडीए प्रमाणपत्रावर मोबाइल एनएफसी सपोर्ट असेल असे दिसून आले आहे. काही दिवसांत प्लॅटफॉर्मवर येऊन हा स्मार्टफोन लवकरच भारतात आणि जागतिक स्तरावर लाँच केला जाईल, अशी माहिती आहे.

डिस्प्ले आणि स्टोरेज

ओप्पो रेनो 11 प्रो 5G डिव्हाइसचीनमध्ये 6.74 इंचाचा कर्व्ड ओएलईडी एफएचडी+ डिस्प्लेसह येतो. ही स्क्रीन 120 हर्ट्झरिफ्रेश रेट, 240 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 16000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस प्रदान करते. मोबाइलच्या फ्रंटमध्ये पंच होल कटआऊट नॉच आहे. ब्रँडने या दमदार फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट ऑफर केला आहे. ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो जीपीयू स्थापित आहे.ओप्पो रेनो 11 प्रोमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी दोन व्हेरियंट सादर करण्यात आले आहेत. यात 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज आहे.

कॅमेरा आणि बॅटरी 

 कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर रेनो 11 प्रो ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपने सुसज्ज आहे. यात ओआयएस सपोर्टसह एफ/1.8 अपर्चर सह 59 एमपी प्रायमरी कॅमेरा, 32 एमपी पोर्ट्रेट लेन्स आणि 2 एक्स हायब्रिड झूम आणि 20 एक्स डिजिटल झूमसह 8 MP दुसरा लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. बॅटरीच्या बाबतीत रेनो 11 प्रो मध्ये 4,700mAh  बॅटरी आणि 80 W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर हा मोबाइल अँड्रॉइड 14 वर काम करतो.

इतर महत्वाची बातमी-

How To Update ADHAR Card : सगळी कामं सोडा पण 14 डिसेंबरपूर्वी आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट नक्की करा, नाहीतर…

[ad_2]

Related posts