Madhya Pradesh Assembly Election CM Shivraj Singh Chouhan What Is The Ladli Bahana Yojna Bjp Jyatiraditya Shinde Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MP Election Results 2023 : लोकसभेची (Loksabha Election) सेमीफायनल पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडली. यामध्ये भाजपला (BJP) सर्वाधिक लक्षणीय यश मध्य प्रदेशात (MP Election Results 2023) मिळालं आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी बंडाळी केल्यानंतर काँग्रेस (Congress) सरकार उलथवून भाजपने सरकार स्थापन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसणार का? काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेनं भाजपला कौल देताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

‘लाडली बहना योजना’ ठरली टर्निंग पाँईंट (Ladli Behna Yojana) 

असे असले तरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना राज्यात तिकिट वाटपात स्वत:लाच करावी लागलेली प्रतीक्षा आणि तसेच कोणताही न दिलेला मुख्यमंत्रिपदाचा यामुळे पुन्हा संधी मिळणार की नाही? याची चर्चा रंगली असताना त्यांच्या एका योजनेची चर्चा नक्कीच रंगली आहे. त्या योजनेचं नाव ‘लाडली बहना योजना’ (Ladli Bahana Yojna) आहे. मध्य प्रदेशात भाजप सत्ता राखणार हे निश्चित होताच त्यांनी स्वत: या योजनेचा आवर्जुन उल्लेख केला. इतकंच नव्हे, तर राजकीय तज्ज्ञांच्या मते, मध्य प्रदेशात भाजपने पुन्हा सरकार स्थापन केले, तर त्यात शिवराजसिंह चौहान यांची ‘लाडली बहना योजना’ महत्त्वाची ठरेल, असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. आता राज्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याने या योजनेची चर्चा सुरु झाली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात मध्य प्रदेश आहे. पंतप्रधान मोदींच्या सभा आणि प्रचारामुळेच असे परिणाम पाहायला मिळत आहेत. लाडली बहन योजनेवर काम केले, त्याचा परिणाम दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले होते, असेही शिवराजसिंह चौहान निकालानंतर म्हणतात. त्यामुळे मोदींच्या यशासह त्यांनी योजनाही टर्निंग पाँईंट झाली हे अधोरेखित केली आहे. मध्य प्रदेशच्या राजकारणात शिवराजसिंह चौहान मामा या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यामुळे मामांच्या लाडलीने टर्निंग पाँईट झाला, अशीच चर्चा सुरु झाली आहे. 

‘लाडली बहना योजना’ आहे तरी काय? (What is the Ladli Behna Yojana) 

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्या आश्रित मुलांचे संगोपन आणि कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका मजबूत करण्याच्या उद्देशाने शिवराजसिंह चौहान सरकारने ‘मुख्यमंत्री लाडली बहना योजना’ (Ladli Bahana Yojna) आणली होती. ही योजना 28 जानेवारी 2023 रोजी संपूर्ण मध्य प्रदेशात लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. हे 15 मार्च 2023 रोजी याची अंमलबजावणी करण्यात आली. 

शिवराजसिंह चौहान यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सुरुवातीला राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. यानंतर सरकारने या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत ऑक्टोबर महिन्यापासून 1250 रुपये केली आहे. सध्या राज्यातील 1.3 कोटी महिलांना त्याचा लाभ मिळत आहे.

मुख्यमंत्री शिवराज यांनी या योजनेंतर्गत मिळणारी रक्कम दरमहा तीन हजार रुपये करण्याची घोषणाही केली आहे. यावर्षी जून महिन्यात जबलपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सीएम शिवराजसिंह चौहान ( Shivraj Singh Chouhan on Ladli Bahana Yojna) म्हणाले होते की, “जसा मी पैशांची व्यवस्था करत राहीन, ते वाढवत राहीन आणि दरमहा 3000 रुपयांपर्यंत करेन.”

या योजनेचा लाभ कोणाला मिळत आहे?

  • अर्ज करताना महिलेचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • लाडली बहना योजनेंतर्गत पात्र महिलांसाठी तीन श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत.
  • पहिल्या श्रेणीत ज्या महिला आर्थिक दुर्बल आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळेल.
  • दुसऱ्या श्रेणीत 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • तिसऱ्या श्रेणी अंतर्गत ज्या बहिणींचे  वार्षिक उत्पन्न 2.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांना योजनेचा लाभ मिळेल.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग आणि सामान्य प्रवर्गातील सर्व गरीब महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता बहिणी पात्र असतील.
  • योजनेचे अर्ज ग्रामपंचायत, प्रभाग आणि अंगणवाडी केंद्रात शिबिरे आयोजित करून भरले जातील.

[ad_2]

Related posts