Madhya Pradesh Election Result 2023 major factor of win shivraj singh chouhan

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Madhya Pradesh Election Results 2023: मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. मध्यप्रदेशमध्ये पुन्हा एका शिवराज नावाचा जयजयकार होत असून राजकीय कारकिर्द संपण्याची वाट पाहणाऱ्या विरोधकांना शिवराज चौहान यांनी चोख उत्तर दिलं आहे. मध्यप्रदेशात भाजप बहुमताने सत्तेवर आलंय. विधानसभा निवडणुकीआधी शिवराजसिंग चौहान (shivraj singh chouhan) यांच्या  राजकीय कारकिर्दीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण शिवराज चौहान यांनी जोरदार पुनरागमन केलं आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शिवराज चौहान यांचा अजेंडा यशस्वी ठरला आहे. 

लाडली बहन योजनेचं यश
शिवराज चौहान यांना घराघरात पोहोचवणारी टलाडली बहना’ योजना प्राईम फॅक्टर मानली जातेय. या योजनेने शिवराज चौहान यांच्या राजकीय कारकिर्दला वेगळं वळण मिळालं. मध्य प्रदेशमध्ये मामा म्हणून ओळखले जाणारे शिवराज राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय आहेत. लाडली बहना योजनेअंतर्गत मध्यप्रदेशमधल्या 1.31 कोटी महिलांना महिना 1250 रुपये दिले जातात. सात कोटी लोकसंख्या असलेल्या मध्यप्रदेशच्या लोकांनी या योजनेमुळे शिवराज चौहान यांना भरभरुन मतं दिली. राज्यातील महिला-मुलींना शिवराज नावावर विश्वास बसला आहे. काँग्रेसची पारंपारीक मतं मानल्या जाणाऱ्या एस-एसटी व्होटबँकलाही शिवराज चौहान यांनी धक्का दिला. 

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवराज चौहान यांनी लाडली बहना योजनेचा जोरदार प्रचार केला. गेल्या काही वर्षातला हवालाही त्यांनी दिला. ग्रामीण भागातील मुलींसाठी असलेली लाडली लक्ष्मी योजनाही लोकप्रिय झालीय. याशिवाय त्यांच्या इतर योजनांचाही राज्यात बोलबाला आहे. ज्युनिअर स्तरावर असलेल्या 30 लाख कर्मचाऱ्यांच्या पगार आणि दिल्या जाणाऱ्या विविध भत्त्यात वाढ केली. आंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पगार 10000 रुपयांवरुन 13000 हजार रुपये केला. रोजगार मदतनीसांचा निधी 9000 रुपयांवर 18000 हजार करण्याचा आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि उपसरपंचाचं मानधन तिप्पट करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

पक्षांतर्गत आव्हान नाही
मध्यप्रदेशमध्ये 16 वर्षांपर्यंत मुख्यमंत्रीपदाची (Madhya Pradesh CM) जबाबदारी सांभाळणाऱअया शिवराज चौहान यांची जमेची बाजू म्हणजे पक्षांतर्त त्यांना मोठं आव्हान नाहीए. पक्षात कैलाश विजयवर्गीय, नरेंद्र सिंह तोमर, गणेश सिंह, राकेश सिंह, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गन सिंह कुलस्ते यांच्याकडून आव्हान मिळण्याची शक्यता होती. पण शिवराज चौहान यांनी त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवत आपली योग्यता सिद्ध करण्यास सांगितलं. यातून शिवराज चौहान यांनी त्यांना एक इशारा दिला आहे. पक्षात मोठी जबाबदारी हवी असेल तर स्वत:ला सिद्ध करा. याशिवाय भाजपाच्या दिग्गज नेत्या उमा भारतीसुद्धा निवडणुकीपासून दूर आहेत. त्यामुळे शिवराजसिंग चौहान यांच्याशिवाय लोकांमध्ये दुसरा मोठा चेहरा नव्हता. 

हिंदुत्वाची गर्जना आणि बुलडोझर फॅक्टर
मध्य प्रदेशात हिंदुत्वाची मुळे खूप खोलवर आहेत. धर्मनिरपेक्ष काँग्रेसलाही मध्यप्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वावर अवलंबून राहावे लागलं. पण मतदारांनी भाजपच्या हिंदुत्वाचा ब्रँड निवडला. राज्यातील मंदिरांना अध्यात्मासोबतच आधुनिकता देण्यात शिवराज प्रयत्न करतायत.  उज्जैन कॉरिडॉर हे त्याचं उदाहरण आहे. याशिवाय शिवराज यांनी सल्कानपूरमधील देवलोक, ओरछा इथील रामलोक, सागरमधील रविदास स्मारक आणि चित्रकूटमधील दिव्य वनवासी लोक या राज्यातील चार मंदिरांच्या विस्तार आणि स्थापनेसाठी 358 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. 

याशिवाय उत्तर प्रदेशप्रमाणे मध्यप्रदेशातही शिवराजसिंग चौहान यांनी बुलडोझर ब्रँड वापरला. उज्जैनमध्ये मिरवणुकांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवला. उज्जैनमध्येच मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचे घर बुलडोझरने उद्ध्वस्त करण्यात आलं.

ब्रँड शिवराज
मध्यप्रदेशमध्ये गेली 16 वर्ष राज्य करणारे मुख्यमंत्री शिवाराजसिंग चौहान एक ब्रँड बनले आहेत. राज्याला आजारी श्रेणीतून त्यांनी बाहेर काढलं आहे. अनेक शहरांचा त्यांनी कायापालट केलाय. त्यांच्या कामाची पद्धत लोकांना आवडलीय. यंदाच्या निवडणुकीत जनतेसमोर शिवराज आणि कमलनात हे दो पर्याय होते. मतदारांनी 16 वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवराज यांना पुन्हा एकदा कौल दिला आहे. 

Related posts