Lonavla Maharashtra MNS Protest For Marathi Hording Activists Removed Other Language Boards Detail Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लोणावळा : राज्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असणाऱ्या लोणावळ्यात (Lonavla) मनसेने (MNS) आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी पाट्या (Marathi Board) नसणाऱ्या दुकानांवर सोमवार 4 डिसेंबर रोजी मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चा धाडला अन इतर भाषिक पाट्या काढून टाकल्या. नेहमी पर्यटकांनी गजबज असणाऱ्या लोणावळ्यात आज काहीकाळ तणावाचे वातावरण होते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपल्यानं मनसे कार्यकर्ते असे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर प्रशासनाने इतर भाषिक पाट्या लावणाऱ्या दुकान मालकांना नोटिसा धाडू, असं प्रशासनाने आश्वासन दिलंय. त्यामुळं उर्वरित पाट्या दुकान मालकांनी स्वतःहून काढून घेतल्या नाहीत अथवा प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही तर त्या पाट्या मनसे स्टाईल हटविल्या जातील, असा थेट इशारा मनसेकडून देण्यात आलाय. 

दरम्यान मराठ्या पाट्यांचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयाच्या मैदानात पोहचला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने देखील दुकानांवर मराठी पाट्या असायलाच हव्यात असे निर्देश दिले आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठीपणाची बाजू ठाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी राज्यातील अनेक भागांमध्ये मराठी पाट्यांवर मनसे आक्रमक झाली. 

पुण्यातही मनसे कार्यकर्ते आक्रमक

दुकानं आणि अस्थापनांवरली मराठी पाट्यांसाठी मुंबई, ठाण्यानंतर आता पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल.  पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील पाट्या मराठीत लिहिल्यामुळे मनसेने आंदोलन केलं. मनसेचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील दुकानांची नावं इंग्रजीत लिहून असलेल्या पाट्या फोडल्या. यावेळी  मनसेचे शहराध्यक्षांसोबतच मनसेचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले. महापालिकेने दुकांच्या पाट्या बदलण्याचे आदेश दिले आहेत तरीही नावं बदलण्यात न आल्याने दुकानांवरील पाट्यांची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत सर्व पाट्या दुकानदारांनी मराठी स्थानिक भाषेत करावेत, असे आदेश दिले होते. त्याची मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपली. त्यानंतर मुंबईतील अनेक परिसरातील इंग्रजी पाट्या हटवून मराठी पाट्या लावण्यात आल्या. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत सगळ्यांना आवाहन केलं. त्यानंतर ज्या ठिकाणी इंग्रजी पाट्या दिसल्या त्याठिकाणी आंदोलन केलं होतं.  दरम्यान यावर आता प्रशासन कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याचप्रमाणे मनसे या मुद्द्यावर आणखी आक्रमक होणार असल्याचा इशारा देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय. 

हेही वाचा :

‘मराठी पाट्या लावा नाहीतर तुमच्या तोंडाला काळे फासू’, दुकानांवरील इंग्रजी पाट्यांविरोधात नाशिकमध्ये मनसे आक्रमक

[ad_2]

Related posts