Chhatrapati Sambhaji Raje Letter To Mps Of Maharashtra On Maratha Reservation Manoj Jarange

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत.मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्रात सुरु केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी संभाजीराजे यांच्याकडून सतत प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. आता छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी दिल्लीत एकत्र येण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे.  मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळकटी मिळवण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचा उल्लेख करत सर्व खासदारांना संभाजीराजेंनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना दिल्लीमध्ये एकत्र बैठकीला येण्यासाठी हे  पत्र लिहिले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे महाराष्ट्रात सुरु असलेले आंदोलन,  महाराष्ट्र दौरा तसेच युवकांच्या आत्महत्यांचा उल्लेख करत मराठा आरक्षण मिळविण्यासाठी सर्व खासदारांची एकी महत्वाची असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळकटी मिळविण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचा उल्लेख आपल्या पत्रात केला आहे. 

काय म्हणाले संभाजीराजे आपल्या पत्रात? 

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षापासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्यमोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहे. काही युवकांनी यासाठी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजाने आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पुढे आणलेली आहे. मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देवून 2014  मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर 2018 मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकले नाही. मी स्वतः 2007  पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वतः देखील केली आहेत. राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तरपणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन ही केले होते.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत. या पार्श्वभूमीवर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उचलणे आवश्यक आहे. या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

 

[ad_2]

Related posts