Pune News Savitribai Phule Pune University News Free Bus Service Within SPPU Campus Read To Know More

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी 10:30 वाजतापासून सुरू होणारी ही सेवा विद्यापीठ परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी विद्यार्थी आणि नागरिकांना पोहचण्यात मदत करणार आहे. यामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

विद्यापीठाचा परिसरात मोठा असल्याने स्वतःचे वाहन नसलेल्या विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेसाठी विद्यापीठातर्फे दोन बसेसे देण्यात आल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून ही सेवा उपलब्ध असून विद्यापीठाच्या सर्व प्रमुख विभाग आणि कार्यालयासमोर जवळपास 13 बस थांबे सुरू करण्यात आले आहे. भविष्यात विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रतिसाद बघता थांब्यांच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. तसेच ठिकठिकाणी यासंदर्भात फलकही लावण्यात येणार आहेत. याशिवाय येत्या काळात बससेवेसाठी स्वतंत्र उपयोजन (ॲप्लिकेशन) विकसित करण्याचे विद्यापीठ प्रशासनाचे नियोजन आहे.

बसचे थांबे कोणते असतील?

विद्यापीठाचा मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र (जयकर ग्रंथालय), रसायनशास्त्र विभाग, परिक्षा विभाग, आंतरराष्ट्रीय केंद्र, मुख्य इमारत, तंत्रज्ञान विभाग, मुलींचे वसतीगृह, आरोग्य केंद्र, पुंबा, मुलांचे वसतीगृह, मुख्य प्रेवशद्वार. 

बसचे वेळापत्रक कसे असेल?

सकाळी 10:30 पासून दर अर्ध्या तासाला ही बस चालणार आहे.  

या सेवेमुळे विद्यार्थी, प्राध्यापक, सेवक आणि नागरिकांना निश्चित मदत होणार आहे. हा प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी विद्यापीठातर्फे अॅप तयार केले जाणार आहे. ज्यामुळे बस नेमकी कुठे आहे, किती वेळात कोणत्या थांब्यावर पोहचेल यांची माहिती वापरकर्त्यांना मिळेल, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी सांगितलं.

विद्यापीठात आल्यावर विद्यार्थी, नागरिकांना आधी खुप पायपीट करावी लागायची. मात्र प्रशासनाने दोन सीएनजी बसेसे पुरवून ही सेवा सुरू केल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. या इको-फ्रेंडली सेवेचा जास्तीत जास्त लोकांना उपभोग घेता येईल यासाठी भविष्यात यात आणखी चांगले बदल करण्यात येईल, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी सांगितलं आहे.

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : पुण्यातील धक्कादायक घटना, मस्करीत मित्राच्या गुदद्वाराला पाईप लावून शरीरात भरली हवा, 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

 

 

 

[ad_2]

Related posts