कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Actors Stuck in Chennai Floods 2023: बंगालच्या उपसागरात मिचोंग नावाच्या चक्रीवादळानं हाहाकार माजवला आहे. सध्या या चक्रीवादळात अनेकांना आपला जीवही गमावाला लागला असून मुंबईहून चेन्नईला शिफ्ट झालेला बॉलिवूड सुपरस्टार आमिर खाननंही या चेन्नईमध्ये आलेल्या पुरातून सुखरूप बाहेर आला आहे. त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फक्त आमिर खानचं नाही तर असे अनेक कलाकार आहेत ज्याचीही सध्या चर्चा आहे. यावेळी तेही या पुरात अडकले होते. यावेळी सोशल मीडियावरून त्यांनी याची माहिती दिली आहे.

सध्या या चक्रीवादळामुळे आंध्रप्रदेश, ओडिसा, तामिळनाडू अशा राज्यांतील किनारपट्टीत लगत भागांमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे. सध्या येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. येथील भागांमध्ये मदतही जोरात पुरवली जाते आहे. चेन्नईच्या या पुरात काही लोकप्रिय पाच दाक्षिणात्त्य सुपरस्टारही अडकले आहेत. त्यामुळे त्यांचीही बरीच चर्चा आहे. 

1. तामिळ अभिनेता विशालदेखील या चेन्नईच्या पुरात अडकला होता. त्यानं सांगितले की कशाप्रकारे आलेल्या पुरामुळे त्याच्या घरात आणि आजूबाजूला पाणी शिरले व तसेच त्यामुळे त्याला आपल्या घरातच अडकून राहावे लागले होते. उद्याप त्यानं कुठल्या परिस्थितीचा फोटो पोस्ट केलेला नाही. 

2. विष्णु विशाल या अभिनेत्याच्याही पोस्ट सध्या चर्चा आहे. त्याचा विला हा ईस्ट कोस्ट येथे आहे. यावेळी त्याच्याही घरात पाणी शिरले. याचे त्यानं फोटोही पोस्ट केले आहेत. यावेळी घरात पाणी गेल्यामुळे तो घराच्या कौलावर होता. जिथून रेक्यू टीमनं त्याची सुटका केली आहे. यावेळी आमिर खानंही त्याच्यासोबत होता. विष्णु विशाल हा तामिळ चित्रपट अभिनेता आणि निर्माता आहे. 

3. अभिनेत्री आत्मिका हिनं देखील सोशल मीडियावरून काही फोटो शेअर केले आहेत. तिच्याही घराजवळ पाणी साचले होते. यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, येथे वीज आणि नेटवर्क नाहीये. पाणीही नाहीये. मला विश्वास आहे हे योग्य आधिकाऱ्यांपर्यंत पोहचेल. टेरेसवर थोडं नेटवर्क येतंय. सर्वांसाठी मी प्रार्थना करते आहेत. 

4. अभिनेता प्रसन्न यानंही देखील सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या घराच्या आसपासही पाणी साचले असून यावेळी त्यांनीही मदत पोहचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. 

5. अभिनेत्री कनिहा हिनं इन्स्टाग्रामवरून चेन्नईच्या पुराची माहिती दिली आहे. तिच्याही कॉलनी पावसामुळे पाणी भरलेले आहे. यावेळी तिला आपलं घर सोडवं लागलं आहे असं तिनं म्हटलं आहे.

सध्या सेलिब्रेटींच्या या पोस्टनं चाहत्यांनाही काळजी वाटू लागली आहे. 

Related posts