बदलापूरच्या जांभळांना मिळालं भौगोलिक मानांकन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

महाराष्ट्रात कोकणातील आंबा, नाशिकमधील द्राक्षे आणि नागपूरची संत्री जशी प्रसिद्ध तसेच बदलापूरच्या जांभळांनी जगभरात नावलौकिक कमवल आहे. 

बदलापूर येथील जांभळांला अखेर भौगोलिक मानांकन मिळाले आहे.  विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात मिळालेल हे पहिले भौगोलिक मानांकन आहे. आता बदलापूरच्या जांभळांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे.  

बदलापूरमध्ये उत्पादित होणाऱ्या जांभळांना कृषी उत्पादनात भौगोलिक निर्देशांक प्राप्त झाला आहे. 

बदलापूरच्या जांभळांना अखेर भौगोलिक मानांकन मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. जांभूळ परिसंवर्धन ट्रस्टच्या आदित्य गोळे या तरुणाच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न सुरू होते.

विशेष म्हणजे भौगोलिक मानांकन प्राप्त होणारं बदलापूर जांभूळ हे देशातलं पहिलं जांभूळ ठरलं आहे. 

बदलापूर परिसरातील सुमारे 20 गावातील सुमारे 1200 झाडे शोधून अंदाजित डाटा तयार करण्यात आला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून अस्सल, रसदार आणि गोड बदलापुरचा हलवी आणि गरवी जातीच्या जांभळाची आता जागतिक पातळीवर दखल घेतली जाणार आहे.

विशेष म्हणजे तसेच भौगोलिक मानांकन प्राप्त होणार बदलापूर जांभूळ हे देशातील पहिलं जांभूळ आहे. 


हेही वाचा

पनवेल : १५ जून पर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद

[ad_2]

Related posts