Manoj Jarage Patil Attack On Minister Chhagan Bhujbal On Maratha Reservation And OBC Reservation Point Hingoli Maharashtra Detail Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

हिंगोली : शिकला होता तर तुरुगांत कशाला गेला, माझं शिक्षण नाही तरी मी आरक्षण निर्णयावर आणलं असं म्हणत जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. शुक्रवार 7 डिसेंबर रोजी हिंगोलीत (Hingoli) जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange) सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.  जिल्ह्यातील डिग्रस फाट्यावर ही सभा होती. ही सभा 110 एकरवर  घेण्यात आली असून 140 एकरवर सभेसाठी येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची पार्किंग व्यवस्था केली गेली होती. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीमध्ये हिंगोलीच्या रामलीला मैदानावर ओबीसीची सभा झाली होती, त्यानंतर आज जरांगे यांनी सभा घेतली. 

शांततेत आंदोलन करण्याचा हक्क संविधानाने दिला – जरांगे पाटील

शांततेत आंदोलन करणं हा संविधानाने आम्हाला दिलेला हक्का आहे.  मराठा आरक्षणाचा विषय संपवयचा मराठ्यांनी ठरवलं.आमच्या चूक काय या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नाही. मराठ्यांना मोडून काढण्याचं सरकारचं षडयंत्र होतं. पण आम्ही भ्ययलो नाही. जे भ्यायले ते मराठे नाहीत, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 

त्याला आता सुट्टी नाही, जरांगेंची भुजबळांवर टीका

आता त्याला सुट्टी नाही, त्याच्या माघं मी आहेचं, असं म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी भुजबळांचा एकेरी उल्लेख केला. तो जातीय तेढ निर्माण करतोय. गावाखेड्यातील ओबीसी मराठ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. मला शिक्षण नसून मी आरक्षण निर्णयावर आणलं की नाही, तू जर शिकलेला होतास तर तुरुगांत कशाला गेला, असा सवाल जरांगे पाटलांनी भुजबळांना विचारला. 

दोन महिने होऊनही गुन्हे मागे का घेतले नाहीत – जरांगेंचा सवाल

दोन महिने होऊनही गु्न्हे मागे का घेतले नाही, असा सवाल देखील जरांगे पाटलांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला. आमच्या विरोधात डाव रचू नका. त्या एकट्याचं ऐकून आमच्या विरोधात जाऊ नका गेलात तर जड जाईल, असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला. 

सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार – जरांगे पाटील

सरसकट मराठ्यांना 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास जरांगे पाटलांनी यावेळी व्यक्त केला. 17 डिसेंबरला अंतरवाली सराटी येथे बैठक होणार आहे. या राज्यातील सर्व उपोषणकर्ते आणि बांधवांनी यावेळी उपस्थित राहायचं आहे, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय. 

हेही वाचा : 

‘जरांगे म्हणाले सभेला टाकून येऊ नका रे…’; प्रशासनाने थेट सभेच्या दिवशी कोरडा दिवस घोषित करून टाकलं

[ad_2]

Related posts