Sushama Andhare Thakceray Group Leader Attack On DCM Devendra Fadanvis Asked He Wrote A Letter To Ajit Pawar Because Nawab Malik Is From Miniority Maharashtra Politics Detail Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : नवाब मलिकांच्या (Nawab Malik) संदर्भात उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पत्र लिहिलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खबळ माजल्याचं पाहायला मिळालं. याच संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. मलिक अल्पसंख्यांक असल्यामुळे ही भूमिका घेतली का असा सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केलाय. हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली यामध्ये जनतेच्या प्रश्नावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती, पण चर्चा मात्र वेगळ्याच विषयाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलीये. 

नवाब मलिक अजित पवारांच्या दोन तीन गाठीभेटी झाल्या आहेत, त्यावेळी मालिकांनी पाठिंबा जाहीर केलाय. सत्तेत सहभागी झाल्यावर मालिकांचा जामीन झाला आहे, हे विशेष आहे असा आरोप देखील सुषमा अंधारे यांनी केलाय. मालिकांचा राजीनामा घेतला नाही असं आमच्यावर आरोप करणाऱ्या फडणवीसांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतला का असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी केलाय. वाब मलिक अल्पसंख्याक आहे म्हणून काल हा विषय काढण्यात आला का असा घणाघाती प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय. 

आता पुढील तीन दिवस याच विषयावर चर्चा होणार – सुषमा अंधारे

काल हा विषय काढण्यामागे राजकारण वेगळं आहे. आता पुढील तीन दिवस अधिवेशनात याच मुद्द्यावर चर्चा केली जाणार. कोट्यावधी रुपये खर्च करुन अधिवेशन पार पडत असतं. त्यामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यावर चर्चा होण्याची गरज होती, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. 

हा विवेकवाद फडणवीसांना उशीरा का सुचला – सुषमा अंधारे

त्तेपेक्षा देश मोठा हा विवेकवाद फडणवीस यांना उशीरा का सुचला. भावना गवळी, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, प्रफुल पटेल, मुश्रीफ यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? तरी ते सत्तेत महत्त्वाच्या पदावर कसे?कंबोज सारखा आरोपी माणूस बोलायला पुढे करता. तुमचा विवेकवाद कुठे गेला असा प्रश्न उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. 

ड्रग्सचं नेक्सस कधी बाहेर येणार आहे?

मरसाळे, देवकाते अटक झाली. यातला एकही प्रमुख नाही. ठाकूरही शेवटची कडी नाही. कारागृहातून या गोष्टी चालतात. कारागृह निरिक्षक, महानिरीक्षक यांच्यावर काय कारवाई करणार हे सांगावे. तसेच  ड्रग्सचं नेक्सस कधी बाहेर येणार आहे याबाबत देखील माहिती द्यावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली.  अनिक्षा जयसिंघानि प्रकरणात  अमृता फडवणीस यांची चौकशी लावणार का? असा सावल देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय. 

हेही वाचा :

Sushama Andhare On Devendra Fadnavis : अजितदादांना सत्तेत घेताना देश मोठा वाटला नाही का?, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना बोचरा सवाल

[ad_2]

Related posts