DCM Ajit Pawar Said High-level Inquiry Will Be Conducted Into The Pimpari Chinchwad Fire Detail Marathi News  | Ajit Pawar : पिंपरी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पिंपरी चिंचवडमधील (Pimpari Chinchwad)  तळवडे येथे एका केकवरील फायर कँडल बनवण्याचा गोदामाला आग (Fire) लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीमध्ये होरपळून सात जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे. अजित पवारांनी ट्विट करत यावर शोक देखील व्यक्त केलाय. दरम्यान या आगीवर अगदी काही वेळातच अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवण्यात यश आले. हे गोदाम विनापरवाना सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. 

अजित पावरांनी काय म्हटलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली. त्यांनी म्हटलं की,  पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथे केकवरील फायर कँडल बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींवर उपचार सुरु असून त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी प्रार्थना करतो. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी पूर्ण उपाययोजना केल्या जातील.

नेमंक काय घडलं?

पिंपरी – चिंचवडमधील  केकवरील फायर कँडल बनवण्याचा गोदामाला भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आलं. तसेच घटनास्थाळावरुन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आणखी कामगारांचा देखील शोध सुरु आहे. या आगीमध्ये गोदामातील वस्तू देखील जळाल्या. या आगीत मृत्यू झालेल्या सहा जणांची ओळख अजूनही पटलेली नाही मात्र यात 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जखमींमध्ये 7 महिला तर एका पुरुषाचा समावेश आहे. या सगळ्या जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या कारखान्यात जवळपास 20 ते 25 कामगार काम करत होते. मात्र दुपारच्या सुमारात आग लागली आणि कामगारांनी आरडा ओरड सुरु करत या कारखान्यातून बाहेर पडले.

पालिका आयुक्तांनी काय म्हटलं?

दरम्यान या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पिपरी चिंचवडचे पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. त्यांनी म्हटलं की, यामधील मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान यामध्ये पोलीस पुढील तपास आहेत. यामध्ये काही कामगार हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत. 

हेही वाचा :

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू



[ad_2]

Related posts