[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
सिंधुदुर्ग : जगभरातील पर्यटकांना नेहमीच कोकणातील (Kokan) समुद्र किनारे आकर्षित करतात. मात्र आता विवाह सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होतायत. लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपलं लग्न खास व्हावे यासाठी धडपडत असतो. हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग (Beach Wedding). भारतात बीच वेडिंगसाठी गोवा हे सगळ्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. मात्र आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर आणि जगभरात ब्लु फ्लॅक नामांकन असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर लग्न करू शकता.
सध्या प्री विडिंग समुद्र किनाऱ्यावर होतात. मात्र आता लग्न सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होत आहेत. मुंबई, पुणे सारख्या शहरातील युवा पिढी कोकणातील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर लग्न करत आहेत. सोलापूर येथील डॉ. चिराग होरा आणि स्नेहल शिंपी ठाणे यांनी आपलं लग्न अविस्मरणीय व्हावा यासाठी भोगवे समुद्र किनारी लग्न केलं. आपल्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असून असं लग्न होईल असं स्वप्नात देखील पाहिलं नव्हत. वेगळ्या दुनियेत आल्याचा भास होत आहे. मराठी कुटुंब इतकं छान लग्न सोहळा आयोजित करतं शकतं हे एक वेगळेपण आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नवरीच्या आईने दिली.
नवा ट्रेंड नेमका काय?
सध्या लग्नसोहळे हे ट्रेंडनुसार केले जातात. काही जणं मोकळ्या मैदानात, काही जणं आलिशान जागेत लग्न सोहळा आयोजित करतात. त्यातच आता समुद्र किनारी लग्न सोहळे आयोजित करणं हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. यामुळे बऱ्याचदा अस्ताला जाणाऱ्या सुर्याचा मुहूर्त निवडला जातो. निळाशार समुद्र हा नव्या नात्यांचा साक्षीदार देखील होतोय. यामुळे तो लग्नसोहळा हा फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्याच नाही तर कुटुंबाताली प्रत्येक जणाच्या लक्षात राहण्यासारखा केला जातोय.
अनेक कलाकारांनी देखील या बीच वेडिंगची संकल्पनेचा त्यांच्या लग्नसोहळ्यात अवलंब केला. त्यामुळे हा ट्रेंड अधिकच विकसित होत गेला. दरम्यान या ट्रेंडमुळे रोजगाराच्या नव्या संधी देखील कोकण वासीयांना उपलब्ध होतायत. म्हणून कोकणाच्या समुद्र किनाऱ्यांवर आता लग्नसोहळ्यांची देखील रेलचेल पाहायला मिळते.
हेही वाचा :
Lonavala Restaurants : फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? ‘हे’ 5 पर्याय नक्की ट्राय करा
[ad_2]