[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p><strong><a title="नवी दिल्ली" href="https://marathi.abplive.com/topic/new-delhi" data-type="interlinkingkeywords">नवी दिल्ली</a> :</strong> तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या शिरपेचात एक नाही, दोन नाही तर तब्बल चार मानाचे तुरे खोवले गेलेयत. कारण, एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाने मोठी बाजी मारलीय. एबीपी माझाच्या ‘दहाच्या बातम्या’ या बुलेटिनचाही गौरव करण्यात आलाय. दिवसभरातील बातम्यांचा सांगोपांग वृत्तांत मांडणाऱ्या दहाच्या बातम्या बुलेटिनला सर्वोत्तम दैनंदिन न्यूज बुलेटिनचा पुरस्कार मिळालाय. तर, राजकारण, समाजकारण, क्रीडा, विज्ञान, शिक्षण तसेच शेतीसह अनेक विषयांचा जिथं उहापोह होतो… त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या विचारांचं शिंपण जिथं होतं… ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे जिथं अनेक मोठे गौप्यस्फोट झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अनेकदा वेगळी दिशाही मिळालीय. त्या ‘माझा कट्टा’वरही एनटी अॅवॉर्डचं शिक्कामोर्तब झालंय. माझा कट्टाला सर्वोत्तम टॉक शो म्हणून, एनटी अॅवॉर्ड्सचं कोंदण बहाल करण्यात आलंय. त्याचसोबत, महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या, गती देणाऱ्या अनेक विचारांचं जिथं मंथन होतं, आणि सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राचं वर्तमान मांडत, भविष्याचा वेध जिथं घेतला जातो, त्या माझा <a title="महाराष्ट्र" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra" data-type="interlinkingkeywords">महाराष्ट्र</a>, माझं व्हिजनला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी मानाचा पुरस्कार मिळालाय. तसेच, दिवसभर घडलेल्या राजकीय, सामाजिक आणि इतरही क्षेत्रांतील बातम्यांचा अष्टावधानी आढावा घेणाऱ्या, प्रत्येक बातमीच्या सर्व अंगांचा धांडोळा घेणाऱ्या स्पेशल रिपोर्ट बुलेटिनला बेस्ट प्राईम टाइम न्यूज शो विभागात पुरस्कार मिळालाय. एकूणच, तुम्हा प्रेक्षकांच्या पाठबळावरच एबीपी माझाने एनटी अॅवॉर्ड्समध्ये विजयी पताका फडकावलीय. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.</p>
[ad_2]