Bhide Wada In Pune Structure Of Savitribai Phule Memorial In Bhide Wada Chagan Bhujbal

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा (Bhide wada) येथील राष्ट्रीय स्मारक आधुनिक पद्धतीचे करतानाच सावित्रीबाईंच्या काळातील जसं असेल अशा जुन्या काळाशी सांगड घाला, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. स्मारकासाठी आवश्यक निधी राज्य शासनाच्यावतीने देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा आणि महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विस्ताराच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

भुजबळ म्हणाले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथे स्मारक उभारताना ती ‘सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा’ अशी वाटली पाहिजे. यासाठी स्पर्धात्मक स्वरूपात नामांकित वास्तुविशारदाकडून वेगवेगळे आराखडे तयार करुन घ्यावेत. आराखड्यात शाळेच्या परिसरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, फर्निचर,  क्रीडांगण, दृकश्राव्य साधने, जुन्यापद्धतीचे दर्शनी भाग या बाबींचा विचार व्हावा. जागेचा विचार करता शाळेच्या इमारतीत उद्वाहकाची  व्यवस्था करावी.

या परिसरात वाहनतळाची इतरत्र व्यवस्था करण्याच्यादृष्टीने चाचपणी करावी. स्पर्धात्मक युगाचा विचार करता या शाळेतून महिला अधिकारी घडविण्याच्यादृष्टीने शाळेची रचना आणि आधुनिक अभ्यासक्रमाबाबत महानगरपालिकेने चाचपणी करावी. समितीने आराखडा अंतिम केल्यानंतर स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरु करावे. स्मारक पूर्ण झाल्यानंतर अनेकांना समाजकार्याची प्रेरणा मिळेल, असे भुजबळ म्हणाले.

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा यांना जोडणाऱ्या मार्गाचे आरक्षण नगर रचना विभागाने लवकरात लवकर पूर्ण करावे. आरक्षण निश्चितीनंतर पुणे महानगरपालिकेने भूसंपादनाची कार्यवाही सुरु करावी. यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करावी. नागरिकांच्या मागणीबाबत सकारात्मक विचार करण्यात यावा, असेही भुजबळ म्हणाले.

भरपूर प्रयत्नानंतर भिडे वाड्याचं अतिक्रमण हटवलं!

2008 साली हा वाडा पाडून इथं स्मारक उभारण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. मात्र काळाच्या ओघात इथं भाडेकरू म्हणून दुकाने चालवणाऱ्या दुकानदारांनी इथून हटण्यास नकार दिला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. अखेर न्यायालयाने पालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर पोलिसांच्या बंदोबस्तात मध्यरात्री इथली अतिक्रमणं काढण्यात आली आणि जिरणावस्थेत असलेले या वाड्याचे अवशेष पाडण्यात आले.  भारतातील मुलींच्या पहिल्या शाळेचं स्मारक उभं राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्त्री शिक्षणाची जिथून सुरुवात झाली त्या भिडे वाड्याचा इतिहास आता पुन्हा जिवंत होणार आहे. 1 जानेवारी 1848 साली सावित्रीबाईंनी जोतिबा फुलेंच्या साहाय्याने मुलींच्या पहिल्या शाळेची सुरुवात केली. चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित असलेल्या मुली शिकायला लागल्या आणि आणि देशात एका क्रांतीला सुरुवात झाली. 

इतर महत्वाची बातमी-

‘जरांगेंविरूद्ध बोलण्यासाठी भुजबळांना फडणवीसांनी पॉवर ऑफ अॅटर्नी दिलीय का?’ खासदार संजय राऊतांचा सवाल

[ad_2]

Related posts