Sanjay Raut Thackeray Group Leader Encourage Youngsters To Do Bussiness In Solapur Maharashtra Detail Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सोलापूर : सोलापुरात (Solapur) नियोजित कार्यक्रमांसाठी आले असता संजय राऊतांनी (Sanjay Raut) एका हॉटेलच्या उद्घाटन समारंभाला देखील हजेरी लावली. एकमेकांचा हात धरून मराठी माणसाने पुढे गेलं पाहिजे, पाय खेचून नाही. ती औलाद आता तिकडं गेलीये, अशा शब्दात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. बाळासाहेबांचे एक स्वप्न होत, मराठी तरुणांनी व्यवसायात घट्ट पाय रोऊन उभं राहील पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी माणसाचं अशी हॉटेलं उभी राहीली पाहिजेत, असं संजय राऊत म्हणाले. 

महाराष्ट्राची आर्थिक ताकद आपल्याकडेच असायला हवी – संजय राऊत

व्यापार काय मोदींनीचं करायचा काय असा घणाघाती सवाल देखील यावेळी राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्राची आर्थिक ताकद आपल्याकडे असायला पाहिजे. मराठी माणूस इथेच कमी पडतो . मोठे मोठे राजकारणी गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री या सोलापुरात झाले. सोलापूरचा विकास करण्यासाठी राजकारणाचा उपयोग करून घेतला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. 

महाराष्ट्राचे सगळे उद्योग गुजरातला जातायत – संजय राऊत 

आज महाराष्ट्राचे सगळे  उद्योग गुजरातला जातायत आणि गुजरातचे सगळं ड्रग्स महाराष्ट्रात येतायत. आतापर्यंत 10 लाख कोटी कर्ज सरकारने माफ केलं. त्यातील सर्व कर्ज घेणारे हे गुजरातचेच होते. तुम्ही ही कर्ज काढा, एक दिवस आपल ही कर्ज सरकार माफ करेल. फक्त कर्ज काढा आणि यालाच गुजरातीमध्ये व्यापार म्हणतात, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला आहे. या देशाला लुटावं आणि आपल घर भराव असा विचार कधी मराठी माणसाच्या मनात आलं नाही. व्यवसायात समाजसेवा करू नका हे गुजरात्याकडून शिकलं पाहिजे, असं राऊतांनी म्हटलं. 

राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक 

सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झालेत. सध्या या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते घेत आहे.

हेही वाचा : 

Jaykumar Gore : सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, तो आम्हीच लढवणार, आमदार जयकुमार गोरेंचा दावा, अजित पवारांच्या निर्णयाला आव्हान? 

[ad_2]

Related posts