Weird Tradition : भारतातील ‘या’ गावात नवरदेवाची बहीण करते वहिनीसोबत लग्न, तर नवरदेव असतो…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Tribal Tradition :  भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र गुणागोविंदाने राहतात. प्रत्येक धर्मानुसार त्यांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. लग्नाबाबतदेखील वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज आहेत. आज आपण भारतातील अशा एका प्रथेबद्दल जाणून घेणार आहोत. भारतातील या गावात नवरदेवाची बहीणचं होणाऱ्या नवरीशी लग्न लावलं जातं. तर नवरदेव लग्नाच्या वेळी घरी असतो. काय आहे ही अनोखी परंपरा आणि यामागील कारण पाहूयात. (Weird Marriage Tradition In this village in India the bridegroom sister marries her sister in law Gujarat Tribal Tradition )

नंनद वहिनीचं लग्न!

एका वेबसाइटनुसार भारतातील या आदिवासी जमातीमध्ये नंनद आणि वहिनीचं लग्न लावलं जात. या गावातील लग्नांमध्ये नवरदेव घरी असतो तर नवरदेवाची बहिणी आपल्या भावासाठी वहिनीशी लग्न करुन तिला घरी आणते. या प्रथेमध्ये नवरदेवाची अविवाहित बहीण किंवा कुटुंबातील अविवाहित तरुणीशी लग्न होणाऱ्या नवरीशी केलं जात. 

प्रथेमागील कारण जाणून व्हाल अवाक्!

या जमातीत लग्नाची ही परंपरा अनेक वर्षांपासून आजही पाळली जात आहे. या गावातील कुलदेवता ही अविवाहित होती. या देवीचा सन्मानासाठी लग्नावेळी नवरदेव हा घरीच राहतो. तर त्याच्या जागी त्याची अविवाहित बहीण लग्नासाठी नवरदेव म्हणून जाते. असं म्हणतात या कुलदेवतेचा कोप नवरदेवाला लागू नये म्हणून ही प्रथा पाळली जाते. लग्नाच्या या सोहळ्यात नवरदेव लग्नाचे कपडे परिधान करुन तयार होतो. अगदी फेटा बांधून पारंपारिक तलवारही घेतो पण तो लग्नासाठी नवरीच्या घरी जात नाही. 

GujaratTribalTradition

नंनद करते लग्नाचे विधी!

रिपोर्टनुसार या लग्न सोहळ्यात नवरदेवाची अविवाहित बहीण वरात घेऊन वहिणी आणण्यासाठी जाते. तर नवरदेव आईसोबत घरीच राहतो. लग्नातील नवरदेवाचे सर्व विधी बहीण पार पाडते आणि नवरीशी लग्न करुन तिला घरी आणते. लग्नातील सप्तपदीपासून मंगळसूत्र घालण्यापर्यंत सगळे विधी बहीण पार पाडते. 

या जमातीतील आदिवासी लोकांचं म्हणं आहे की, ही परंपरा पाळली नाही, त्याच्यावर वाईट संकट कोसळतं. या लोकांनी सांगितलं की, एका नवरदेवाने ही परंपरा पाळली नाही, तेव्हा त्याचं लग्न लवकरच मोडलं होतं. काही लोकांच्या जीवनात वेगवेगळ्या समस्याने ग्रासलं होतं. 

कुठे आहे ही परंपरा?

लग्नाची विचित्र आणि धक्कादायक परंपरा भारतातील गुजरातमधील गावांमध्ये आजही पाळली जाते. गुजरातमधील सुरखेडा, सनादा आणि अंबाल गावांमधील आदिवासी जमातीमध्ये ही लग्नाची विचित्र प्रथा पाळली जाते. 

 

Related posts