45052389000… ‘हा’ आकडा पाहून डोळे गरगरतील; अमेरिकेत सापडली ‘पांढऱ्या सोन्याची’ खाण

( प्रगत भारत । pragatbharat.com)

White gold’ mine discovered in US: संपूर्ण जगात अमेरिकेचा दबदबा आहे. चीन हा अनेक क्षेत्रात अमेरिकेस बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अमेरिकेच्या हाती असा खजिना सापडला आहे की चीन कधीच अमेरिकेस बरोबरी करु शकणार नाही. अमेरिकेत  ‘पांढऱ्या सोन्याची’ खाण सापडली आहे. हे पांढर सोनं म्हणजे लिथियम धातू आहे. अमेरिकेत सापडलेल्या या लिथियम धातूच्या खाणीचे मूल्य भारतीय रुपयांमध्ये 45052389000 इतके आहे. 

अमेरिकेतील शास्त्रज्ञांना संशोधनादरम्यान दक्षिण कॅलिफोर्नियातील एका विशाल तलावाच्या तळाशी ही लिथियम धातूची खाण सापडली आहे. लिथियम धातू पांढऱ्या वाळूसारखे चमकदार दिसत अससल्याने याला पांढरे सोनं म्हणून देखील ओळखले जाते.
indy100 ने या लिथियम धातूच्या खाणीबद्दल अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अमेरिकेतील सर्वात मोठे सरोवर असलेल्या सॅल्टन समुद्राचा अभ्यास संशोधक करत होते. या संशोधनासाठी ऊर्जा विभागामार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. तलावाच्या तळाशी किती लिथियम आहे हे शोधणे हा या संशोधनाचा उद्देश होता. तलावाच्या तळाशी 18 दशलक्ष टन लिथियमचा साठा असू शकतो असा संशोधकांचा दावा आहे. 

या तलावात चार दशलक्ष टनांपेक्षा जास्त लिथियम आहे. ड्रिलिंग प्रक्रियेद्वारे हे लिथियम शोधण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या तलावाच्या तळाशी मोठ्या प्रमाणात लिथियम धातूचा साठा असल्याचा संशोधकांचा दावा आहे. 

लिथियम धातूचा अमेरिकेला काय फायदा होणार?

मोठ्या प्रमाणात सापडलेल्या या लिथियम धातूच्या साठ्यामुळे अमेरिकेला जबरदस्त फायदा होणार आहे. लिथियम धातूचा वापर वाहनांमधील बॅटरी निर्माण करण्यासाठी केला जातो. अमेरिकेत सापडलेल्या लिथियम धातूच्या साठ्यापासून तब्बल 382 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवणे शक्य होणार आहे. चीनला मागे टाकून  अमेरिका रसायनांच्या क्षेत्रात आघाडीचा देश बनणार आहे. 

जगातील सर्वात मोठा लिथियम साठा

अमेरिकेत सापडलेला हा लिथियम साठा जगातील सर्वात मोठ्या लिथियम साठ्यांपैकी एक असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील भू-रसायनशास्त्राचे प्राध्यापक मायकेल मॅककिबेन म्हणाले. यामुळे अमेरिका लिथियममध्ये पूर्णपणे स्वयंपूर्ण होऊ शकते. अमेरिकेला चीनकडून लिथियम आयात करण्याची गरज पडणार नाही.  कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूजम यांनी साल्टन लेकला लिथियमचे सौदी अरेबिया म्हंटले आहे.  

Related posts