[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
देशात डेंग्यूच्या रुग्णसंख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमाकांर आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये डेंग्यूच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. वाढते शहरीकरण, गर्दी तसेच डेंग्यू प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचा योग्य पाठपुरावा न झाल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर या काळात राज्यात डेंग्यूचे 17,528 रुग्ण आढळले. यामध्ये 100 टक्क्यांहून अधिक वाढ दिसते. सन 2022च्या या काळात 8578 रुग्णांची नोंद झाली होती. यंदा राज्यात 14 जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला आहे. मागील वर्षी डेंग्यूमुळे जीव गमावलेल्यांची संख्या 27 इतकी होती. यंदा उत्तर प्रदेशमध्ये 33,319 रुग्ण आढळले. 30 नोव्हेंबरपर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला.
ग्रामीण भागापेक्षा मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या शहरी भागामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या आहे. केवळ मुंबईमध्ये राज्यातील एकूण रुग्णसंख्येच्या एक तृतीयांश रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये 5261, नाशिकमध्ये 1383 तर नागपूरमध्ये 1295 रुग्ण आढळले.
वातावरणातील बदल, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव यामुळे रुग्णसंख्येमध्ये होणारी वाढ अधिक आहे. राज्यात डेंग्यूनिदानासाठी सव्वा लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोना संसर्गानंतर राज्यामध्ये कीटकजन्य आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा वेग कमी झाला आहे. त्या दोन वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणेचा भर हा करोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होता.
हेही वाचा
सायन रुग्णालयात लवकरच 1200 खाटा उपलब्ध होणार
नायरमधे 10 मजली कर्करोग रुग्णालय उभारण्यात येणार
[ad_2]