WTC 2023 Final India vs Australia Sunil Gavaskar Predicted Playing 11 : फायनल मॅचमध्ये संघ निवडीबाबतचा गोंधळ गावस्करांनी दूर केला, स्पष्ट म्हणाले…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचला आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. द ओव्हल मैदानावर होणारी ही लढत ७ जूनपासून सुरु होणार आहे.चॅम्पियनशिपच्या या लढतीसाठी अंतिम ११ मध्ये कोणाचा समावेश करावा यावरून अद्याप गोंधळाची परिस्थिती आहे. त्यातच ईशान किशनला दुखापत झाल्याने टीम इंडियाची अडचण आणखी वाढली आहे. इतक नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेची ओव्हर मैदानावरील कामगिरी मात्र अतिशय खराब आहे. फिरकीपटूंमध्ये रविंद्र जडेजा की आर अश्विन यापैकी कोणाची निवड करायची यावर मतभेद आहेत. अशाच महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या लढतीसाठीची प्लेइग इलेव्हनची निवड केली आहे.

दीपक आणि गरिमाच्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा; ७ जूनला होणाऱ्या पत्रिका आहे खास
३ जलद गोलंदाज आणि इतके फिरकीपटू…

माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या मते भारताने फायनल मॅचसाठी ३ जलद गोलंदाज आणि २ फिरकीपटूंना संधी द्यावी. विकेटकीपर म्हणून ईशान किशनच्या ऐवजी केएस भरतची निवड करावी. भारताचा २०२१ साली न्यूझीलंडकडून पराभव झाल्यानंतर आता संघाला चॅम्पियन होण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. अंतिम सामन्यासाठी गावस्करांनी विकेटकीपर म्हणून केएस भरतची निवड केली आहे.

फलंदाजीबाबत बोलताना ते म्हणाले, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी सलामीला यावे. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्यावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणेने फलंदाजी करावी.

WTC फायनलच्या आधी विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाला कामाला लावले; संपूर्ण संघ करतोय फक्त एकच गोष्ट
गावस्करांच्या मते भारतीय संघ सहाव्या क्रमांकाबाबत थोडा कमकूवत दिसतो. या क्रमांकासाठी भरत आणि ईशान किशन हे दोन पर्याय आहेत. मला वाटते सहाव्या क्रमांकावर भरतने फलंदाजी करावी. त्याने आतापर्यंत सर्व मॅच खेळल्या आहेत. गोलंदाजीबाबत संघात ३ जलद आणि २ फिरकीपटू असावेत असे ते म्हणाले. अंतिम सामन्यासाठी त्यांनी अक्षर पटेलचा संघात समावेश केला नाही.

कोण असतील ३ जलद गोलंदाज

सातव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा, आठव्या क्रमांकावर आर अश्विन हे चांगली फलंदाजी करू शकता. जलद गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, मोहम्मस सिराज आणि शार्दुल ठाकूर हे असतील. गावस्करांच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने वनडेत द्विशतक करणाऱ्या ईशान किशनला स्थान दिले पाहिजे असे म्हटले होते. पॉन्टिंगच्या मते ईशान हा संघासाठी X फॅक्टर ठरू शकतो.

अल्पवयीन महिला कुस्तीपटूकडून बृजभूषण सिंगांवरील आरोप मागे; कुस्तीपटूंच्या आंदोलनाला सेटबॅक
गावस्करांचा WTC फायनलसाठीचा संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts