MS Dhoni Fan Prints His Photo and Jersey Number 7 on Wedding Card; दीपक आणि गरिमाच्या लग्नाची संपूर्ण देशात चर्चा; ७ जूनला होणाऱ्या पत्रिका आहे खास

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करणाऱ्या महेंद्र सिंह धोनीची क्रेझ किती आहे हे सर्वांना माहिती आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या १६व्या हंगामात प्रत्येक मॅचमध्ये धोनीला पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात मैदानात आले होते. जणून धोनी प्रत्येक मॅच त्याच्या घरच्या मैदानावर खेळत असल्याचे वाटत होते.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ जेव्हा फलंदाजी करायचा तेव्हा चाहत्यांची एकच इच्छा असायची की धोनी बॅटिंगला यावा. यासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाज लवकर बाद व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करायचे. आयपीएलच्या फायनलमध्ये धोनीच्या संघाने गुजरात टायटन्सवर अखेरच्या चेंडूवर थरारक असा विजय मिळवला. धोनी या लढतीनंतर निवृत्ती घेईल अशी शक्यता अनेकांना वाटत होती. त्यासाठी त्याला निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र धोनीने चाहत्यांसाठी अजून एक वर्ष खेळणार असल्याचे म्हटले आहे.

रेल्वे अपघातात सर्वस्व गमावलेल्यांच्या मदतीला आला विरेंद्र सेहवाग; संवेदनशीलतेचे होत आहे कौतुक
धोनीच्या चाहत्यांची क्रेझ याआधी अनेकदा पाहिली आहे. आता एका चाहत्याने स्वत:च्या लग्न पत्रिकेवर धोनीचा फोटो छापला आहे. इतक नाही तर धोनीचा जर्सी नंबर पत्रिकेवर घेतला आहे. ही लग्नपत्रिका सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. धोनीचा हा चाहता छत्तीसगडचा आहे.

WTC फायनल IND vs AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम

दीपक पटेल असे या चाहत्याचे नाव असून तो धोनीला लहानपणापासून आदर्श मानतोय. दीपकने सांगितले की, धोनीच्या नेतृत्वातून अनेक गोष्टी मी शिकल्या आहेत आणि गावातील संघााचे नेतृत्व करतोय. दीपक आता लग्न करतो आणि पत्रिकेवर चेन्नई सुपर किंग्जचा रंग पिवळा आहे आणि धोनीचा फोटो देखील. त्याच्या विवाहाच्या तारीख देखील ७ जून आहे. दीपकचे धोनीबद्दलचे हे प्रेम पाहून अनेकांना अश्चर्य वाटत आहे. त्याची लग्नपत्रिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

पहिल्या सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन; असे आहेत नियम, विजेता कसा ठरणार? कधी, कुठे होणार जाणून घ्या
दरम्यान, आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर धोनी गुढघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईत आला होता. येथील कोकीलाबेन रुग्णालयात धोनीच्या गुढघ्यावर शस्त्रक्रिया झाली. आयपीएलच्या संपूर्ण हंगामात त्याला गुढघ्याच्या दुखापतीचा त्रास होत असल्याचे अनेकदा जाणवले होते.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts