World Environment Day Special India Ready For Bigger EV Adoption Audi E-tron

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Audi E-tron EV: तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करावी का? हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर देण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला आहे, पण हा निर्णय योग्य आहे की नाही हे आम्ही स्वतः तपासून पाहण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicle) बाजारातील वाटा वाढला आहे, यात शंका नाही आणि ईव्हीमध्ये (EV) तंत्रज्ञानाचा पुरेपुर अवलंब केल्यामुळे आणि अधिक प्रयोग करता येत असल्यामुळे लोक लक्झरी सेगमेंटमधील ईव्ही (Luxury EV Cars) अधिक खरेदी करत आहेत यात शंका नाही. तथापि, वाढत्या ईव्हीचा अवलंब करण्यासाठी भारत देखील पायाभूत सुविधांसह तयार आहे का? हे तपासण्यासाठी आम्ही दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांमध्ये चालवण्यासाठी सर्वाधिक विकल्या जाणार्‍या लक्झरी ईव्हींपैकी एका ईव्हीचा वापर केला, जेणे करुन भारतात ईव्हीसह जगणे किती सोपे आहे? याचा अंदाज लावता येईल.

ऑडी ई-ट्रॉन

ऑडी ई-ट्रॉन 95 kwh बॅटरी पॅकसह येते आणि यात दोन मोटर्स मिळतात, ज्यातून स्पोर्टी सेटिंगमध्ये 400 bhp पॉवर निर्माण करता येते. शहरात झटपट टॉर्कसह परफॉर्मन्स अगदी चांगला मिळतो आणि स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो. शहरातील अतिशय कमी आवाजात जलद पॉवर जनरेट करण्याची त्याची क्षमता आम्हाला खूप आवडली. ई-ट्रॉन, काही ईव्हीच्या विपरीत, दिल्ली/मुंबईमधील खड्डे किंवा स्पीड ब्रेकर सहजपणे पार करण्यात यशस्वी झाले आणि कुठेही अडकली नाही. दिल्ली आणि मुंबईमध्ये ट्रॅफिक ही एक मोठी समस्या आहे आणि इथे ई-ट्रॉन एक ईव्ही असल्याने आम्हाला त्याची रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमध्ये मदत झाली, ज्यामुळे रेंज ढासळली नाही. दोन्ही शहरांमध्ये, ई-ट्रॉन आरामात 300-350 ची रेंज देण्यात यशस्वी ठरली, आम्ही हायस्पीडमध्ये या ईव्हीचा वापर केला.

वेगवान चार्जरचा अभाव

जर तुमच्या कारची चार्जिंग कमी असेल, तर अशी सेटिंग असते जी कारला कमी चार्जिंगमध्येही अधिक रेंज देण्यासाठी तयार करते. आम्हाला त्याची गरज नव्हती, पण नंतर ई-ट्रॉनची चार्जिंग 30 टक्के शिल्लक राहिली आणि आम्ही चार्जिंग स्टेशन शोधू लागलो. दोन्ही शहरांमधील चार्जिंगच्या पायाभूत सुविधेत मागील वर्षांच्या तुलनेत आता झपाट्याने वाढ झाली आहे.असे अनेक अॅप्स आता उपलब्ध आहेत जे तुम्हाला चार्जिंग स्टेशन शोधण्यात मदत करतात, तर ऑडी (Audi) अॅपमध्ये देखील हे वैशिष्ट्य आहे, जे आम्ही वापरले. मागील वर्षापासून रस्त्य्यालगतच बरेच चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत, जे शोधणे सोपे आहे.

मुंबईत चार्जिंग स्टेशन खूप आहेत, पण एक अडचण अशी आहे की तेथील कोणता चार्जर काम करतो आणि कोणता नाही हे शोधणं कठीण आहे. काही वेळानंतर आम्हाला एक डीसी चार्जर (DC Charger) मिळाला, तेव्हा आम्हाला समजले की वेगवान चार्जर्सच्या बाबतीत भारत अजूनही मागे आहे, परंतु त्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. दिल्लीमध्ये आम्ही चार्जर शोधण्यासाठी अॅप देखील वापरलं आणि आजकाल रेस्टॉरंट्स आणि मॉल्सच्या आसपास जास्त चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत.

चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर होत आहे मजबूत

हे खूप सोयीस्कर आहे आणि आम्ही जेवेपर्यंत आमची कार चार्ज होत होती. मॉल्समधील कार पार्किंग अटेंडंट स्वतंत्र ईव्ही पार्किंग ठेवतात, ज्यामुळे कार चार्ज करणे सोयीस्कर होते. तेथे चार्जर्स खूप आहेत, पण त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. रेग्युलर एसी चार्जरने वाहनाला चार्ज होण्यासाठी सुमारे 8 तास लागतात, परंतु आम्हाला पूर्ण चार्ज करण्याची गरज नव्हती, त्यामुळे थोड्याशा चार्जमुळे आम्हाला ई-ट्रॉनची रेंज वाढवण्यास मदत झाली.

याचाच अर्थ, तुम्ही शहरात ईव्ही वापरू शकता आणि तुम्हाला त्वरित टॉप-अप हवे असल्यास, पुरेसे चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत आणि अॅप्सद्वारे शोधणेही सोपे आहे. तथापि, शहराबाहेर त्यांचा वापर करताना काही समस्या येऊ शकतात.

निष्कर्ष

सर्व ईव्ही उत्पादक तुमच्या घरी चार्जर बसवतात आणि त्यामुळे वेळेची बचत होते. पण आमच्या बाबतीत आम्ही अनुभवले आहे की, तुमच्याकडे चार्जर नसला तरीही तुम्ही रस्त्यावरील पार्किंग वापरताना ते चार्ज करू शकता, तिथे चार्जिंगची सुविधा असते. परंतु चार्जिंगसाठी वेळ देताना तुम्हाला तुमचा वेळ काळजीपूर्वक व्यवस्थापित करावा लागेल. भारतातील ईव्ही पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे, ही बाब भारतासाठी चांगली आहे.

हेही वाचा:

Upcoming Cars: कोणत्या खास वैशिष्ट्यांसह लाँच होणार होंडा एलिवेट? जाणून घ्या…

Car loan Information:
Calculate Car Loan EMI

[ad_2]

Related posts