Tech Marathi News Realme C51 Launching Today Know Features Specifications Know Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Smartphone Launch Today : भारतात आज एक असा स्मार्टफोन (Smartphone) लॉंच होणार आहे. जो सर्वात स्वस्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्मार्टफोनचे हे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे. लॉन्च होण्याआधीच मोबाईलचे जवळपास सर्व स्पेक्स व्हायरल झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घ्या कोणत्या कंपनीचा हा फोन आहे? तसेच याचे फीचर्स काय आहेत?

भारतात स्वस्त फोन लाँच होणार

चीन देशातील मोबाईल निर्माता कंपनी रियल मी (Realme C51 Launching Today) आज भारतात एक स्वस्त फोन लाँच (Smartphone Launch) करणार आहे. हा मोबाइल फोन खासकरून बजेट सेगमेंटमधील लोकांना टार्गेट करून बनवण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला मिनी कॅप्सूल फीचर मिळेल, जे आयफोनमध्ये असलेल्या डायनॅमिक आयलंड इंटरफेससारखेच आहे. यासोबतच फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा आहे.

किंमत काय असेल?

Realme कंपनीने अद्याप किंमत जाहीर केलेली नसली, तरी Realme C51 स्मार्टफोनची किंमत 10,499 रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक यूजर्सनी ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. तुम्ही हा मोबाईल फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक रंगात खरेदी करू शकाल. स्मार्टफोनचा थिकनेस 7.99mm आणि वजन 186 ग्रॅम आहे.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.74 इंचाचा डिस्प्ले मिळेल. मोबाईल फोन ऑक्टा-कोर चिपसेटसह येईल. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरा 50MP आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 mAh बॅटरी आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हा फोन फक्त 28 मिनिटांत 0 ते 50% पर्यंत चार्ज होईल. कंपनी Realme C51 ला 4/64GB आणि 4/128GB सह लॉन्च करेल. तुम्ही मेमरी कार्डद्वारे रॅम 8GB पर्यंत आणि स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. मोबाइल फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला एक मिनी कॅप्सूल आणि 5MP कॅमेरा मिळेल.

हे 2 फोनही नुकतेच झाले लाँच 

Infinix ने नुकताच Infinix Zero 30 5G हा स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला 5000 mAh बॅटरी आणि 108MP प्रायमरी कॅमेरा मिळेल. Infinix च्या आधी Motorola ने Moto G84 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. यामध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर, 50MP OIS कॅमेरा आणि 6.55 इंच FHD प्लस पोलइडी डिस्प्ले मिळेल. 12/256GB वेरिएंटसाठी फोनची किंमत 19,999 रुपये आहे.

[ad_2]

Related posts