मोठी बातमी! पेपर फुटी प्रकरणात सरकारच मोठं पाऊल, नव्या कायद्यासाठी समिती स्थापन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर : राज्यातील स्पर्धा परीक्षांमधील पेपर फुटी प्रकरणानंतर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेत मोठं पाऊल उचलले आहे. राज्य शासनातील पदभरती करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन महिन्याच्या आत यासंदर्भातील अहवाल शासनास सादर करण्याच्या समितीला शासन निर्णयात सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यातील पेपर कुठे संदर्भात कडक कायदा करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेवानिवृत्त अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे. विशेष म्हणजे या समितीत सुरेश काकानी, डॉ शहाजी सोळुंके, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव असणार आहेत. 

स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची कार्यपध्दती पूर्णपणे संरक्षित करण्यासाठी तसेच पेपरफुटी व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाययोजना सुचवल्या जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतील परीक्षा वगळता इतर विभागांतर्गत विविध संवर्गाच्या परीक्षांची कार्यपध्दती व सदर परीक्षांसंदर्भात पेपरफुटी तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासकीय व कायदेशीर उपाययोजना सुद्धा समितीकडून सुचवल्या जाणार आहेत. प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत समिती आपला अहवाल शासनास सादर करेल, असेहि शासन निर्णयात म्हटले आहे. 

[ad_2]

Related posts