Nagpur Youth Committed Suicide By Jumping Under The Truck Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नागपूर :  व्यसनाच्या आहारी गेलेल्या एक तरुणाने जीवनाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे. ज्यामध्ये या तरुणाने पहिल्यांदा काचेची बाटली फोडून गळ्यावर वार केला आणि नंतर स्वत:ला  ट्रकखाली झोकून देत आत्महत्या (Suicide) केल केली आहे. शेख नसरू असं या 30 वर्षीय युवक मृतकाचे नाव आहे. ही थरारक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसा पॉवर हाऊस चौकात घडली. या तरुणांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांना (Nagpur City Police) मिळताच त्यांनी घटणास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर या घटनेत युवकाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दारूच्या व्यसनापोटी टोकाचे पाऊल 

30 वर्षीय शेख नसरू हा त्याच्या आईसोबत ताजबाग परिसरात राहत होता. त्याची घराची परिस्थिति अतिशय बिकट असून तो मिळेल ते काम करून आपली उपजीविका भागवत होता. गेल्या काही दिवसांपासून तो स्वयंपाक घरात लागणारे साहित्य तयार करून त्याची विक्री करण्याचे काम करत होता. या तरुणाला दारूचे व्यसन होते. या व्यसनाच्या तो फार आहारी गेल्याने त्याला दारूसाठी कायम पैश्याची गरज भासत होती. शिवाय कमावलेले पैसे देखील तो घरी देत नव्हता. त्यामुळे या तरुणाच्या जाचाल कंटाळून मृतकांची आईने भीक मागून आपली उपजीविका भागावण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. मृतकाची आई ही नागपुरातील ताजबाग परिसरात भीक मागत असायची. या मृत युवकाजवळचे  पैसे संपल्यावर तो त्याच्या आईकडे दारुसाठी पैसे मागायचा. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणही होत होते. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

थेट ट्रकला जाऊन दिली धडक 

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मृतक शेख नसरू हा बेसा पॉवर हाऊस चौकातील टपरीवर बसला होता. अचानक त्याने तिथे असलेली काचेची बाटली हातात घेऊन फोडली. त्यानंतर फुटलेल्या बाटलीचा काच उचलून त्याने स्वतच्या गळ्यावर वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो अल्पावधीतच रक्तबंबाळ झाला. दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या  मदनलाल गौतम (वय ३८ रा. न्यू नरसाळा) यांनी त्याला विचारण केली आणि असे कृत्य करण्यास पासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या त्या प्रयत्नाला फार यश आले नाही. याचदरम्यान मृतक शेख नसरू हा युवक तेथून पळू लागला. त्यानंतर तो त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकसमोर धाव घेवून गेला. त्यानंतर तो थेट ट्रकला जाऊन धडकला आणि खाली पडून बेशुध्द झाला. त्यानंतर या घटनास्थळी मोठा जमाव जमला.  या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी जखमीला तत्काळ मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

 

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts