Vivah Panchami 2023 : विवाह पंचमीला दुर्मिळ योगामुळे ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्यशाली! धनवृद्धीसह लाभच लाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Vivah Panchami 2023 : विवाह पंचमीला अनेक दुर्मिळ योगामुळे राशींवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. आज चंद्र मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीसोबत रवि योग, हर्षण योग, मालव्य योगसोबतच धनिष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे या योग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. (Vivah Panchami will be lucky for these zodiac signs due to rare yoga Gains are gains with wealth growth)

मेष (Aries Zodiac) 

विवाह पंचमी या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुमच्या कानावर आनंदाची बातमी पडणार आहे. व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. वडिलांच्या मदतीने नवीन वाहन किंवा जमीन खरेदीचे योग आहेत. नशीब तुमच्या बाजूने राहिल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. वैवाहिक जीवनात जोडीदारशी संबंध मजबूत होणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

हर्ष योगामुळे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या वाणीतून लोकांचं मन जिंकणार आहात. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. लव्ह लाइफसाठी हा योग चांगला आहे. तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत कुठेतरी डिनरसाठी जाऊ शकता. कुटुंबातील सदस्याच्या लग्नाची बोलणी होणार आहे. ज्यामुळे घरात आनंदी आनंदाच असणार आहे. नात्यामध्ये प्रेम वाढणार आहे. 

सिंह (Leo Zodiac)

विवाह पंचमी रवि योगामुळे या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांवर नशिबाने साथ मिळणार आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांच्या मदती होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं संबंध चांगले होणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवणार आहे. आरोग्याचा समस्या दूर होणार आहे. भविष्यासाठी भावांसोबत गुंतवणूक करणार आहे. 

धनु (Sagittarius Zodiac) 

विवाह पंचमी आणि मालव्य योगामुळे धनु राशीच्या लोकांसाठी आनंददायी ठरणार आहे. धनु राशीचे लोक कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालविणार आहे. अपेक्षित नफा मिळाल्याने छोटे व्यापारी खूश होणार आहे. तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेट होणार आहे. ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होणार आहे. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे. तुमच्या सासरकडून आर्थिक लाभ होणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. 

कुंभ (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीच्या लोकांसाठी विवाह पंचमी शुभ असणार आहे. कुंभ राशीचे लोकांच्या कानावर सकारात्मक बातमी पडणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी योग लाभदायक ठरणार आहे. एकाग्रता वाढल्यामुळे तुमच्या समस्या कमी होणार आहे. तुम्हाला जुन्या मित्राला भेट घडणार आहे. तसंच व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होणार आहे. धार्मिक कार्यात रस वाढणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts