Covid19 Sub Variant Jn1 New Case One Patient Died In Kerala Due To Covid New Rapidly Spreading Variant Know All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Covid19 Sub Variant-Jn1 in Kerala: गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट (New Subvariant of Covid) भारतात (India Corona Update) आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) याबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनानं ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 नोव्हेंबर रोजी आरटी-पीसीआर चाचणीत 79 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. महिलेनं सांगितलं की, तिला इन्फ्लूएंझा सारख्या आजाराची (ILI) सौम्य लक्षणं आहेत आणि ती COVID-19 मधून बरी झाली आहे. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, दरम्यान, केरळचे आमदार केपी मोहनन यांनी शनिवारी कन्नूर येथील पनूर नगरपालिका रुग्णालयात कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांची पाहणी केली.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भारतातील कोविड-19 रुग्णांपैकी 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत आणि होम आयसोलेशनमध्ये आहेत. यापूर्वी, सिंगापूरमधील एका भारतीय प्रवाशालाही JN.1  सब-व्हेरिएंट आढळून आला होता. ते तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबर रोजी सिंगापूरला गेले होते. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तमिळनाडूमधील इतर ठिकाणी हा स्ट्रेन आढळल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही वाढ झालेली नाही. “भारतात JN.1 व्हेरियंटचा इतर कोणताही दुसरा रुग्ण आढळून आलेला नाही.”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी बोलावली तातडीची बैठक 

केरळमध्ये कोविडच्या भीतीनंतर आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी तातडीची बैठक बोलावली. अधिकाऱ्यांना मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू नये यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच या पार्श्वभूमीवर केरळच्या सीमा बंद केल्या जाणार नसल्याचंही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं.  

आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव म्हणाले की, आम्हाला मॉक ड्रिल करावं लागेल आणि कशासाठीही तयार राहावं लागेल. पुनरावृत्ती होत असल्यास, आपण तयार असणं आवश्यक आहे. आम्ही मास्क, ऑक्सिजन सिलेंडर इत्यादींची तयारी केली आहे.

केरळमधील कन्नूरमध्ये वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील पनूर नगरपालिकेतील प्रभाग-1 निवली येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. आता या घटनेनंतर, परिसरात कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत. आमदार केपी मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अब्दुल्ला असं मृताचं नाव असून हा रुग्ण 80 वर्षांचा होता. खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णावर उपचार सुरू होते.

[ad_2]

Related posts