Sarpanch Post Qualified Celebrate Victory Procession On Camels Dharashiv News Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धाराशिव : सरपंचपद वाचल्याचा आनंद सरपंचांनी स्वत:ची उंटावरून मिरवणूक काढून साजरा केल्याचा प्रकार धाराशिव  (Dharashiv) जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट गावात घडला आहे. 13 सदस्य असलेल्या ईट गावच्या ग्रामपंचायतीचे संजय असलकर हे सरपंच आहेत. पण सरपंच हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गावातीलच कार्यकर्त्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. मात्र, या ठरावावरील मतदानासाठी आयोजित केलेल्या बैठकीला, अविश्वास ठराव दाखल करणारे तेराही सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे असलकर यांचे सरपंचपद वाचले. त्यामुळे आनंद साजरा करणाऱ्या या सरपंचाने चक्क स्वत:ची उंटावरून मिरवणूक काढली. एवढंच काय तर डीजे लावून जेसीबीच्या माध्यमातून यावेळी फुलांची उधळण देखील करण्यात आली.  संजय असलकर असे सरपंचाचे नाव आहे. 

धाराशीव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील ईट गाव आहे. ईट हे गाव तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. या गावची ग्रामपंचायतदेखील मोठी आहे. तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून या गावाची ओळख आहे. संजय असलकर यांची याच गावाच्या सरपंचपदी निवड झाली. मात्र, ते मनमानी कारभार करतात असा आरोप करून 14  पैकी 13 सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. या ठरावावर मतदान घेण्यासाठी 13 डिसेंबर रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संजय असलकर आणि त्यांच्या सोबतचा एक सदस्य असे दोघेच या बैठकीला उपस्थित होते. मात्र, ज्या तेरा जणांनी अविश्वास ठराव दाखल केला होता, ते या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे असलकर यांचे सरपंचपद कायम राहिल्याने अविश्वास ठराव फेटाळला गेला. त्यामुळे असलकर 13 डिसेंबर रोजी ते पुन्हा सरपंचपदी निवडून आहे. तहसीलदार सचिन खाडे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

डीजे लावत जेसीबीच्या द्वारे फुलांची उधळून

आपलं सरपंच पद वाचल्याचा आनंद साजरा करण्यासाठी संजय असलकर यांनी गावात अनोखी मिरवणूक काढली. डीजे लावत जेसीबीच्या द्वारे फुलांची उधळण करत इतर सदस्यांना देखील उंटावरून मिरवत मिरवणूक काढली. सरपंचाची मिरवणूक पाहण्यासाठी अख्खा गाव जमा झाला होता. लोक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आनंद साजरा करतात, मात्र सरपंचविरोधाची तक्रार निकाली निघाली व आपले सरपंच पद वाचले म्हणून चक्क उंटावरून मिरवणूक काढल्याने मिरवणूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच या मिरवणुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sangli News : मोठ्या भावाची उपसरपंचपदी निवड, छोट्या भावाने गावाला आणि गावच्या राम मंदिराच्या कळसाला हेलिकॉप्टरने घातली प्रदक्षिणा!

 

[ad_2]

Related posts