[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेना आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. हिवाळी अधिवेशना दरम्यान घेतलेल्या सुनावणीत शिंदे गटाच्या पाच आमदारांची उलटतपासमी झाली. दोन्ही बाजूंनी सादर केलेली कागदपत्रे, पुरावे, साक्षी आणि उलटतपासणीच्या आधारावर आता युक्तिवाद होईल. तर २० डिसेंबरपर्यंत सुनावणी संपवून निर्णय राखून ठेवला जाईल. तसेच पुढील वीस दिवसांत आमदार अपात्रतेचा अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. </p>
[ad_2]