[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Onion : कांद्याच्या निर्यातबंदीवरुन (Onion Export Ban) सध्या राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विविध शेतकरी संघटनांसह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी (Oion Price) घसरण झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरम्यान, लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. दुसरीकडे NCCF (National Cooperative Consumers Federation) कडून कांदा खरेदी सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात कांदा खरेदी होत नसल्याची शेतकरी ओरड करत आहेत.
लासलगाव बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांकडून लासलगाव बाजार समितात कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. निर्यातबंदीवरुन कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारनं तातडीनं कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय. तसेच शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
लासलगावात कांद्याला सरासरी 2100 रुपयांचा दर
लासलगाव बाजार समितात सध्या कांद्याला सरासरी 2100 रुपयांचा दर मिळत आहे. तर कमीत कमी 800 तर जास्तीत जास्त 2304 रुपयांचा भाव मिळत आहे. कांदा निर्यात बंदी उठवावी, यासाठी बाजार समितीत शेतकऱ्यांनी आमरण उपोषण देखील सुरु केलं आहे.
NCCF कडून कांदा खरेदी सुरु नाहीच
केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी केल्यानंतर कांद्याचे भाव सतत कोसळत असल्यानं मनमाड येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. कांद्याच्या दरात सुरु असलेली घसरण सुरुच आहे. दुसरीकडे NCCF कडून कांदा खरेदी सुरु असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र, कांदा खरेदी होत नसल्याची ओरड शेतकऱ्यांनी केलीय.
सोलापूर बाजार समितीत केवळ 600 ट्रक कांदा लिलावसाठी सोडला जाणार
सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांदा लिलावमध्ये गोंधळ झाला होता. या गोंधळानंतर आज पुन्हा बाजार सुरु झाला आहे. कांद्याच्या लिलावासाठी बाजार समितीनं नवीन नियम केले आहेत. बाजारात आता केवळ 600 ट्रक कांदा लिलावसाठी सोडला जाणार आहे. उर्वरित कांदा गाड्यांना दुसऱ्या दिवशीच्या लिलावसाठी टोकन नंबर देऊन पार्किंगमध्ये थांबवले जाणार आहे. बाजारात लिलाव झालेला कांदा बाहेर पडल्याशिवाय बाहेरील गाड्या आतमध्ये सोडल्या जाणार नाहीत. बाजार समितीच्या नवीन नियमामुळं बाजारात आज कोणताही गोंधळ नाही, शिस्तबद्ध पद्धतीने बाजारात लिलाव सुरु आहेत. कांद्याचे दर देखील स्थिर आहेत. आज कांद्याला साधारण 1800 ते 2200 रुपये दर मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
दरवर्षीच का होतो कांद्याचा वांदा? निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना किती बसतोय फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती
[ad_2]