प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता,  13 कोटी 37 लाखाचं मनी लॉड्रिंग झाल्याचा ठपका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री प्रकरणात न्यायालयातील विशेष PMLA कोर्टानं  प्रोसेस जारी केलीये. ईडीने (ED) प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात 13 कोटी 37 लाखाचं मनी लॉड्रिंग झाल्याचा ठपका ठेवलाय. 26 कोटी 32 लाखांची मागणी असलेला कारखाना 12 कोटी 95 लाखात या नाममात्र दरात विकल्याचा प्राजक्त तनपुरे यांच्यावर करण्यात आला आहे. 

या प्रकरणात प्राजक्त तनपुरे, प्रसाद तनपुरे, सुभाष देशमुख, रणजित देशमुख यांसह प्रसाद शुगर अलाईड अग्रो प्रॉडस्टस लीआणि तक्षशिला सिक्युरिटीज प्रा लि. यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच 12 जानेवारी 2024 रोजी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती देण्यात येणार आहे. पदाचा दुरुपयोग करत दबाव टाकून कारखान्याची 110 एकर जागा गिळंकृत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं MRA मार्ग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यावर  ईडीकडून ईसीआयआर दाखल करण्यात आलाय. 

हेही वाचा :

Mumbai News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या पत्राला सामाजिक न्याय विभागाची केराची टोपली?

[ad_2]

Related posts